कडलास जिल्हा परिषद गटातून शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार शोभाताई बाबासो खटकाळे निवडणूक रिंगणात
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
कडलास जिल्हा परिषद गटात उमेदवार शोभाताई खटकाळे यांचे वर्चस्व , सर्व स्तरातून उमेदवारीला पाठिंबा
सांगोला/ प्रतिनिधी: सोलापूर जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने सांगोला तालुक्यातील कडलास जिल्हा परिषद गटातून शिवसेना-भाजप युतीच्या उमेदवार शोभाताई बाबासो खटकाळे यांनी शिवसेनेकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला आहे.
कडलास जिल्हा परिषद गटातून शोभाताई खटकाळे यांच्या गावभेट दौऱ्यात उमेदवारीला जनसामान्यातून मोठा प्रतिसाद मिळत आहे. पंचायत समितीच्या उपसभापती असताना कडलास जिल्हा परिषद गटात केलेल्या विकास कामाच्या जोरावरती
शोभाताई खटकाळे यांच्या उमेदवारीला शिवसेना-भाजप पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते, मतदार, युवावर्गातून मोठ्या प्रमाणात प्रोत्साहन मिळत आहे. शोभाताई खटकाळे यांचा कडलास जिल्हा परिषद गटामध्ये मोठा जनसंपर्क असल्याने त्यांचा विजय निश्चित मानला जात आहे.
कडलास जिल्हा परिषद गटात कडलास ,अकोला, वासुद- केदारवाडी, वाटंबरे, अजनाळे, लिगाडेवाडी, कमलापूर, गोडसेवाडी, चिणके, य.मंगेवाडी, वझरे या गावांचा समावेश होत आहे.
या गावातून कडलास जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार शोभाताई खटकाळे यांच्या उमेदवारीला मतदारांचा उत्स्फूर्तपणे पाठिंबा असल्याने त्यांची उमेदवारी ही भविष्यकालीन विकासासाठी महत्त्वाची मानली जात आहे.
यावेळी उमेदवार शोभाताई खटकाळे प्रतिक्रिया व्यक्त करताना म्हणाल्या, कडलास जिल्हा परिषद गटात येणाऱ्या गावाच्या विकासासाठी सर्वतोपरी प्रयत्न केला जाईल .
गावच्या विकासाला प्रथम प्राधान्य देऊन विकासाप्रती कटीबद्ध आहे. कडलास जिल्हा परिषद गटातील नागरिकांच्या अडचणी व प्रश्न सोडवण्यासाठी आपण प्रामाणिकपणे प्रयत्न करू व या गटामध्ये शासनाच्या
सर्व योजना तळागाळापर्यंत व शेवटच्या घटकापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रयत्न राहतील. या गटातील जनतेचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी मतदार बंधू भगिनींनी उस्फूर्तपणे मला मतदान करून विजयी करावे. पुढील पाच वर्ष त्यांची सेवा करण्याची संधी द्यावी असे आवाहन शोभाताई खटकाळे यांनी केले आहे.


0 Comments