google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 योगेशदादा खटकाळे यांच्या पुढाकारातून कडलास येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील रस्त्याचे काम पूर्ण

Breaking News

योगेशदादा खटकाळे यांच्या पुढाकारातून कडलास येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील रस्त्याचे काम पूर्ण

योगेशदादा खटकाळे यांच्या पुढाकारातून कडलास येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेजवळील रस्त्याचे काम पूर्ण


निसर्ग संवर्धनासाठी कडलास येथे मान्यवरांच्या आर्थिक सहभागातून केले वृक्षारोपण

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला /प्रतिनिधी:कडलास येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेकडे जाणाऱ्या रस्त्याची अवस्था अत्यंत खराब झाल्याने शाळकरी मुले व पालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. 

ही समस्या कडलास येथील युवकांनी योगेशदादा खटकाळे यांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी तात्काळ दखल घेत संबंधित यंत्रणेला सूचना दिल्या.

योगेशदादा खटकाळे यांच्या आदेशानुसार रस्त्याची दुरुस्ती करून देण्यात आली असून, रस्त्याचे काम पूर्ण झाल्यामुळे शाळेत ये–जा करणाऱ्या लहान मुलांना व पालकांना मोठा दिलासा मिळाला आहे. ग्रामस्थांनी या तातडीच्या आणि प्रभावी कार्यवाहीबद्दल समाधान व्यक्त केले आहे.

माजी आमदार शहाजीबापू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली जनतेच्या प्रश्नांवर त्वरित उपाययोजना करण्याची जी परंपरा आहे, त्याच परंपरेनुसार हे काम पूर्ण करून देण्यात आले असे यावेळी कार्यकर्त्यांनी सांगितले. तसेच कडलास येथे वृक्षारोपण ही करण्यात आले.

 शहाजीबापू पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून येणाऱ्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांमध्ये शिवसेना–भाजप महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ. शोभाताई बाबासाहेब खटकाळे व कडलास गणाच्या उमेदवार सौ .राणीताई सुरज पाटील यांना 

कडलास परिसरातून चांगला व सकारात्मक प्रतिसाद मिळत असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.जनतेच्या प्रश्नांवर फक्त आश्वासन न देता प्रत्यक्ष काम करून दाखवणारे नेतृत्व हीच महायुतीची खरी ताकद असल्याचे यानिमित्ताने स्पष्ट झाले.

        कडलास येथे वृक्षारोपण करण्यासाठी पुढील मान्यवरांनी आर्थिक मदत केली. या मदतीच्या माध्यमातून वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. यामध्ये राजू काकासाहेब गव्हाणे,भारत तुकाराम गायकवाड ,

संकेत भारत गायकवाड ,सुनील शिवाजी महांकाळ ,शरद लक्ष्मण मोरे,सयाजी जालिंदर गायकवाड , उद्योगपती प्रशांत दत्तात्रय तेली ,दत्तात्रय टापरे ,गुलाबराव दिगंबर गायकवाड ,सुनील हनुमंत गायकवाड ,

दत्तात्रय रामचंद्र गायकवाड ,महेश मारुती लेंडवे ,संतोष आप्पासो जाधव ,दत्तात्रय भारत वाघ ,सचिन शिवाजी चव्हाण,बाबुराव रामचंद्र गायकवाड ,यशोदीप बाबुराव गायकवाड,सुनील ज्योतीराम पवार ,अभिजीत शेखर पवार,

दिलिपकुमार बजरंग जाधव यांच्यासह आदी मान्यवरांचा समावेश आहे.

Post a Comment

0 Comments