google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. सांगोला -कोळे येथे तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला ; दोघांविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

Breaking News

मोठी बातमी.. सांगोला -कोळे येथे तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला ; दोघांविरोधात सांगोला पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल.

मोठी बातमी.. सांगोला -कोळे येथे तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला ;


दोघांविरोधात सांगोला पोलिस  ठाण्यात गुन्हा दाखल.

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला ( प्रतिनिधी) सांगोला तालुक्यातील कोळे (ता. सांगोला) विद्यामंदिर प्रशाला

 कोळे येथे प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित झेंडावंदन व सांस्कृतिक कार्यक्रमादरम्यान

 प्रशालेच्या बाहेरील पटांगणात एका तरुणावर चाकूने प्राणघातक हल्ला झाल्याची खळबळजनक घटना घडली आहे.

 या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात दखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत सांगोला पोलीस ठाण्यात गुन्हा रजिस्टर नंबर 77/2026 नुसार बीएनएस कलम 109, 115(2), 351(2)(3), 352, 3(5) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

या सांदर्भिय प्रकरणात सुभाष सदा आलदर (वय 48, व्यवसाय शेती, रा. नाथबाबा वस्ती, कोळे, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली आहे.

 त्यांचा मुलगा युवराज सुभाष आलदर (वय 19) हा दिनांक 26 जानेवारी 2026 रोजी सकाळी 8 वाजण्याच्या सुमारास 

कोळा विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेज येथे झेंडावंदन व सांस्कृतिक कार्यक्रमासाठी गेला होता. 

दुपारी 9 ते 10 वाजण्याच्या सुमारास आरोपी शंकर मारुती घाडगे (रा.कोळे) व समाधान श्रीमंत होनमाने (रा.जुनोनी, ता. सांगोला) यांनी मिळून 

युवराज यास दमदाटी व शिवीगाळ करत जीवे ठार मारण्याच्या उद्देशाने सोबत 

आणलेल्या चाकूने पोटात भोसकून गंभीर जखमी केल्याचे फिर्यादीत नमूद आहे.या हल्ल्यात युवराज आलदर गंभीर जखमी झाला

 असून त्याच्यावर उपचार सुरू सद्या प्रकृती स्थिर असून या घडलेल्या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस निरीक्षक विनोद घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत पुजारी करत असून फिर्याद मोरे यांनी नोंदवली आहे.

Post a Comment

0 Comments