मोठी बातमी..जवळा गटात मुलींच्या शिक्षणाची क्रांती! २००० सायकल… २००० स्वप्नांना पंख !
१ ते ५ कि.मी. अंतरावरील पाचवी ते दहावीच्या मुलींना मोफत सायकल मा. श्री. अतुल (मालक) पवार यांचा ऐतिहासिक निर्णय
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला प्रतिनिधी: जवळा गटातील मुलींच्या शिक्षणासाठी एक क्रांतिकारी आणि दूरगामी परिणाम करणारा उपक्रम राबविण्यात येत
असून, या उपक्रमामुळे शिक्षणाच्या प्रवासातील अडथळे कायमचे दूर होणार आहेत.
पाचवी ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या आणि १ कि.मी. ते ५ कि.मी. अंतरावरून शाळेत
ये-जा करणाऱ्या विद्यार्थिनींसाठी २००० सायकल वाटपाचा ऐतिहासिक उपक्रम जाहीर करण्यात आला आहे.
हा उपक्रम मा. श्री. अतुल (मालक) पवार यांच्या पुढाकारातून राबविण्यात येत असून,
शिक्षणापासून वंचित राहू नये, सुरक्षितपणे व नियमित शाळेत जाता यावे, हा या योजनेचा मुख्य उद्देश आहे.
ग्रामीण भागात अंतर, वाहतुकीचा अभाव आणि सुरक्षिततेच्या कारणांमुळे अनेक मुलींचे शिक्षण अर्धवट राहते—
या वास्तवावर थेट उपाय करणारा हा निर्णय असल्याचे शिक्षणतज्ज्ञांकडून कौतुक होत आहे.
या सायकल वाटपामुळे मुलींमध्ये आत्मविश्वास वाढेल, उपस्थिती सुधारेल आणि शालेय गळतीचे प्रमाण कमी होईल.
विशेषतः गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबातील विद्यार्थिनींसाठी हा उपक्रम शिक्षणाची नवी दारे उघडणारा ठरणार आहे.
जवळा गटात शिक्षणाला प्राधान्य देत, मुलींच्या उज्ज्वल भविष्यासाठी उचललेले हे पाऊल निश्चितच इतिहास घडवणारे ठरेल.
“मुलगी शिकली तर समाज घडतो” या विचाराला प्रत्यक्षात आणणारा हा उपक्रम परिसरात प्रेरणादायी ठरत असून, सर्व स्तरातून या निर्णयाचे स्वागत केले जात आहे.


0 Comments