अनुसूचित जाती व अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) उपविभागीय दक्षता व नियंत्रण समितीच्या सदस्य पदी
मा. खंडू (तात्या) सातपुते यांची निवड झाल्याबद्दल आंबेडकर चळवळीच्या पदाधिकारी व विविध संघटनेचे पदाधिकार्यांकडुन सत्कार करण्यात आला
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८४८१२)
सांगोला:- अधिनियम 1989 च्या अंमलबजावणीसाठी कार्यशाळा आयोजीत करणे बाबत..
उपविभागीय दक्षता व नियंत्रण समिती ची सभा दिनांक 07/10/2025 रोजी मा. उपविभागीय अधिकारी मंगळवेढा यांचे दालनात पार पडलेली आहे.
सदर सभेमध्ये अनुसुचित जाती जमाती अॅट्रासिटी अंतर्गत गावपातळीवर काम करणारे तलाठी, प्रामसेवक, पोलीस पाटील यांना माहिती बाबत गावपातळीवर प्रशिक्षण देणे बाबत कार्यशाळा आयोजीत करुन प्रचोधन करणे गरजेचे असलेबाबत मुद्दा उपस्थित केलेला आहे.
या सभेमध्ये उपस्थित विषयांस अनुसरुन आपणांस सुचित करण्यात येते की, सांगोला तालुक्यासाठी श्री. खंडू सातपुते सदस्य, श्री. पंकजण काटे. निमंत्रित सदस्य व वैभव काटे- निमंत्रित सदस्य यांना ग्रामपंचायत स्तरावर प्रशिक्षण कार्यशाळेकरिता उपस्थित
राहून प्रबोधन करणेकरिता सुचना केल्या आहेत. तेव्हा संबधिताचे संपर्क क्रमांक खालीलप्रमाणे असून त्यांचेशी संपर्क साधून गावपातळीवर प्रशिक्षण देणे बाबत कार्यशाळेचे आयोजन करण्यात यावे.
तसेच आंबेडकर चळवळीतील विविध संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मा. विक्रम (भाऊ) शेळके मा. विजय (बापू) बनसोडे अँड .महादेव कांबळे पत्रकार संतोष साठे पत्रकार शशिकांत बनसोडे समाधान जावीर ,राजाभाऊ गुळीग ,पत्रकार रवींद्र कांबळे,पत्रकार नितीन होवाळ तसेच सर्व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.


0 Comments