मोठी बातमी! जिल्हा परिषद निवडणुकीबाबत मोठी अपडेट,
निवडणूक आयोगाने निर्णय कळवला; इच्छुकांची धडधड वाढली
नगरपंचायत आणि नगरपरिषद निवडणूकीचा निकाल 21 तारखेला असतानाच जिल्हा परिषद निवडणुकीच्या बाबत मोठी अपडेट समोर आली आहे.
या निवडणुकांसाठी निवडणूक आयोगाने महत्त्वाचे निर्णय घेतला आहे.50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडलेल्या जिल्हा परिषदांविषयी सुप्रीम कोर्टात 21 जानेवारीला सुनावणी होणार आहे.
त्यामुळे या सुनावणीनंतर जिल्हा परिषदच्या निवडणुका घेण्याचा निर्णय आयोगाने घेतला आहे.
दि.28 नोव्हेंबरला सुप्रीम कोर्टात 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलंडल्या संबंधित सुनावणी झाली. या सुनावणीत कोर्टाने निवडणूक घेतली तरी ती कोर्ट जो निर्णय घेईल त्या निर्णयाच्या आधीन ही निवडणूक असेल असे जाहीर केले.
त्यामुळे नगपंचायत आणि नगर परिषदेच्या निवडणूकीत काही जागा, नगराध्यक्षपदाची निवडणूक मतदानाला दोन दिवस बाकी असताना स्थगिती केली होती. आता त्या ठिकाणी 20 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
राज्यातील तब्बल 20 जिल्हा परिषदांनी 50 टक्के आरक्षणाची मर्यादा ओलांडल्याचे समोर आले आहे. त्यामुळे या जिल्हा परिषदेच्या निवडणूका 21 जानेवारीच होणार आहे.
त्यातही कोर्ट काय निर्णय देणार त्यावर या निवडणुकीचे भवितव्य अवलंबून असणार आहे. त्यामुळे निवडणुकीची तयारी करणाऱ्या इच्छुकांची धडधड वाढली आहे.
या ZP त आरक्षणाची मर्यादा ओलांडली
आरक्षणाची मर्यादा ओलांडणाऱ्या नांदेड, अमरावती, अकोला, वाशीम , बुलडाणा, ठाणे, पालघर, नाशिक,धुळे,नंदुरबार,जळगाव, हिंगोली, यवतमाळ,नागपूर,चंद्रपूर, वर्धा,गडचिरोली या जिल्हा परिषदां समावेश आहे.


0 Comments