google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडून ग्रामीण विकासासाठी मोठे पाऊल; पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी अधिवेशनात १५ कोटींची मागणी

Breaking News

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडून ग्रामीण विकासासाठी मोठे पाऊल; पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी अधिवेशनात १५ कोटींची मागणी

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याकडून ग्रामीण विकासासाठी मोठे पाऊल; पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी अधिवेशनात १५ कोटींची मागणी


 मुख्यमंत्री–ग्रामविकास मंत्र्यांचा शब्द; सांगोला पंचायत समितीच्या नूतन प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी लवकरच

नागपूर (प्रतिनिधी) : राज्य विधिमंडळाचे नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनात सांगोला पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय 

इमारतीसाठी १५ कोटी रुपयांचा स्वतंत्र निधी मंजूर करण्यात यावा, अशी मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी नागपूर येथील विधानसभा अधिवेशनात केली.

आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख म्हणाले की, सांगोला पंचायत समितीची सध्याची प्रशासकीय इमारत जीर्ण अवस्थेत असून ती आजच्या प्रशासकीय गरजांसाठी पूर्णपणे अपुरी ठरत आहे.

 कार्यालयीन जागेअभावी विविध विभागांची कामे विखुरलेल्या पद्धतीने सुरू आहेत. याचा थेट परिणाम ग्रामीण भागातील नागरिकांना मिळणाऱ्या सेवा, 

विकास योजनांची अंमलबजावणी तसेच प्रशासकीय कार्यक्षमतेवर होत आहे.

सांगोला तालुका हा दुष्काळी परिस्थितीला सातत्याने सामोरा जाणारा, शेतीप्रधान आणि भौगोलिकदृष्ट्या विस्तीर्ण तालुका आहे. 

पंचायत समितीच्या माध्यमातून राबविल्या जाणाऱ्या विविध राज्य व केंद्र शासनाच्या योजना, रोजगार हमी, पाणीपुरवठा, आरोग्य, शिक्षण, 

महिला व बालविकास, कृषी तसेच ग्रामीण पायाभूत सुविधांच्या योजनांची जबाबदारी मोठ्या प्रमाणावर आहे. मात्र, अद्ययावत 

सुविधा नसलेल्या इमारतीमुळे कर्मचारी व अधिकारी यांना कामकाज करताना अनेक अडथळे येत आहेत, असे त्यांनी अधोरेखित केले.

नवीन प्रशासकीय इमारत ही आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज, प्रशस्त सभागृह, स्वतंत्र विभागीय कार्यालये, नागरिकांसाठी 

प्रतीक्षालय, दिव्यांगांसाठी सोयी, पार्किंग व्यवस्था तसेच डिजिटल सेवा केंद्र यांसह उभारण्यात यावी, 

अशी अपेक्षा आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केली. यामुळे एकाच छताखाली सर्व प्रशासकीय सेवा उपलब्ध होऊन नागरिकांची कामे जलद, पारदर्शक व सुलभ होतील, असे त्यांनी सांगितले.

यासंदर्भात शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा व आगामी अर्थसंकल्पात सांगोला पंचायत समिती प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी रुपयांची तरतूद करावी,

 अशी ठाम मागणी आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांनी संबंधित मंत्री महोदयांकडे केली.

या मागणीला सभागृहात गांभीर्याने दखल घेण्यात आली असून, निधी मंजूर झाल्यास सांगोला तालुक्याच्या ग्रामीण विकासाला मोठी चालना मिळेल

 तसेच नागरिकांना अधिक सक्षम व कार्यक्षम प्रशासकीय सेवा मिळतील, असा विश्वास आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांनी व्यक्त केला. 

चौकट: *मुख्यमंत्री–ग्रामविकास मंत्र्यांचा शब्द; सांगोला पंचायत समिती इमारतीसाठी १५ कोटी लवकरच*

अधिवेशनादरम्यान सांगोला पंचायत समितीच्या नवीन प्रशासकीय इमारतीसाठी १५ कोटी रुपयांच्या निधीबाबत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख 

यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्यासोबत सविस्तर चर्चा केली.आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या मागणीची दखल घेत 

मुख्यमंत्री ना.देवेंद्र फडणवीस व ग्रामविकास मंत्री ना.जयकुमार गोरे यांनी सकारात्मक प्रतिसाद देत लवकरात लवकर आवश्यक निधी उपलब्ध करून देण्याचे शब्द दिला आहे.

 शासन स्तरावर तातडीने प्रक्रिया पूर्ण करून सांगोला पंचायत समिती इमारतीच्या कामाला गती दिली जाणार आहे.

Post a Comment

0 Comments