ब्रेकिंग न्यूज..डॉल्बी व लेझरचा वापर केल्याप्रकरणी सांगोला पोलिसांनी मोठी कारवाई करत सात गुन्ह्यांची नोंद केली
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला/प्रतिनिधी : गणेशोत्सव मिरवणुकांमध्ये डॉल्बी साऊंड सिस्टम व लेझर लाईटचा शो वापरण्यावर जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, सोलापूर यांनी २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर २०२५ या कालावधीत बंदी आदेश जारी केला होता.
मात्र या आदेशाचे उल्लंघन करून सांगोला तालुक्यातील विविध ठिकाणी डॉल्बी व लेझरचा वापर केल्याप्रकरणी सांगोला पोलिसांनी मोठी कारवाई करत सात वेगवेगळ्या गुन्ह्यांची नोंद केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार –गु.र.नं. 714/2025 : आरोपी राजु बोत्रे व आप्पा ऐवळे (रा. सांगोला) यांच्यावर टेम्पो (MH-12-FC-7937) मध्ये डॉल्बी व लेझरचा वापर , गु.र.नं. 716/2025 : आरोपी समाधान मंडले
(रा. करगणी), अतुल माने, विजय लोकरे व कुमार शिनगारे (रा. वाढेगाव) यांच्यावर दोन टेम्पो (MH-10-BC-2111, MH-42-B-5555) मधून डॉल्बीचा वापर , गु.र.नं. 718/2025 :
आरोपी अमोल दामाजी पाटील (रा. कुंभारी, ता. जत) यांच्यावर वाहन (MH-48-G-0213) मधून डॉल्बी-लेझर वापर , गु.र.नं. 719/2025 : आरोपी संकेंत ढवळे (रा. मंगळवेढा) यांच्यावर वाहन (MH-43-U-4262)
मधून डॉल्बी वापर , गु.र.नं. 720/2025 : आरोपी सौरभ खामकर (रा. नारायणगाव, पुणे) यांच्यावर वाहन (MH-11-AL-0719) मधून डॉल्बी वापर , गु.र.नं. 721/2025 : आरोपी विशाल निळे (रा. पारे, सांगोला)
यांच्यावर बिगर नंबर वाहनातून डॉल्बी-लेझर वापर या सर्व गुन्ह्यांमध्ये भारतीय नागरीक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 (1) तसेच बी.एन.एस. 223, 3(5) प्रमाणे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
फिर्यादी म्हणून पोलिस कर्मचारी अमोल वाडकर, विलास बनसोडे व रविंद्र साबळे यांनी तक्रारी नोंदवल्या असून पुढील तपास सांगोला पोलीस ठाण्यातील विविध अधिकाऱ्यांकडे सोपविण्यात आला आहे.
सांगोला पोलिसांचे आवाहन आहे की, जिल्हाधिकारी यांचे आदेशाचे पालन करावे, अन्यथा कठोर कारवाई करण्यात येईल


0 Comments