google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 वंचित तरुणांनी राजकारणात उतरण्याची गरज – सुजात आंबेडकर

Breaking News

वंचित तरुणांनी राजकारणात उतरण्याची गरज – सुजात आंबेडकर


वंचित तरुणांनी राजकारणात उतरण्याची गरज – सुजात आंबेडकर



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला प्रतिनिधी:-  समाजकारण, बँकिंग, क्रीडा, माहिती-तंत्रज्ञान अशी कोणतीही क्षेत्रे उरलेली नाहीत जिथे वंचित समाजातील तरुणांनी आपली छाप उमटवलेली नाही. 

मात्र, एक क्षेत्र आहे.जिथे आपण अजूनही मागे आहोत,ते म्हणजे राजकारण. आता ही उणीव भरून काढण्याची वेळ आली आहे.

 वंचित बहुजन तरुणांनी ठाम राजकीय भूमिका घेत महाराष्ट्रात आपलं स्वतःचं राजकारण उभं करावं. मात्र राजकारणाच्या क्षेत्रात वंचित समाजातील तरुण मागे पडलेला दिसतो. 

ही मोठी पोकळी भरून काढण्यासाठी वंचित तरुणांनी ठाम राजकीय भूमिका घेऊन स्वतःचे राजकारण उभारणे ही काळाची गरज आहे, असे मत वंचित बहुजन आघाडीचे नेते सुजातदादा आंबेडकर यांनी केले. ते सांगोला येथे आयोजित युवा महासंवाद सभेत बोलत होते.

यावेळी वंचित बहुजन आघाडीचे राज्य उपाध्यक्ष सोमनाथ साळुंखे,सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे राज्य प्रवक्ते प्रशांत बोराडे,माढा विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड राहुलजी चव्हाण, चंद्रशेखर मडीखांबे,

महासचिव विशाल नवगिरे जिल्हा उपाध्यक्ष लालासाहेब मुलाणी,सांगोला तालुकाध्यक्ष विनोद उबाळे,ऍड. अक्षयदादा बनसोडे आदी मान्यवर उपस्थित होते.

पुढे बोलताना सुजात आंबेडकर म्हणाले की, “आपले तरुण आज प्रत्येक क्षेत्रात प्रगती करत आहेत. परंतु आजपर्यंत आपण आपल्या विचारांचा मंत्री, मुख्यमंत्री उभा करू शकलो नाही, ही खंत आहे. आपण जे प्रगतीपथावर आलो आहोत, 

ते फक्त विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या भारतीय संविधानामुळे. संविधानामुळेच आपल्याला न्याय, हक्क आणि अधिकार मिळाले, आणि त्या जोरावरच आपण आज सर्व क्षेत्रात यशस्वी ठरलो आहोत.”

तसेच बाबासाहेबांनी दिलेले संविधान टिकवणे ही आपली सर्वात मोठी जबाबदारी आहे. संविधान टिकले तरच आपली पुढची पिढी सुरक्षित राहील.

 तसेच आरक्षण टिकवणेही अत्यंत महत्त्वाचे झाले आहे. काल-परवा खासदार सुप्रिया सुळे यांनी ‘आरक्षण जातीच्या आधारावर नसून आर्थिक निकषावर असावे’ असे विधान केले. 

मात्र जर आरक्षण आर्थिक निकषावर आधारित झाले, तर एससी, एसटी, ओबीसी, व्हीजेएनटी यांचे हक्काचे आरक्षण संपुष्टात येईल 

आणि आपल्या विकासाचे मार्ग कायमचे बंद होतील. त्यामुळे आरक्षण टिकवण्यासाठी आपण सर्वांनी एकजूट दाखवली पाहिजे.असे सुजातदादा आंबेडकर यावेळी बोलताना म्हणाले.

यावेळी रवी सर्वगोड,दीपक माने, अशोक माने, वैभव भंडारे, राजू वाघमारे, नाना वाघमारे,पोपट तोरणे,सिद्धार्थ कसबे,शहाजी गडहिरे,

गोपाळ लांडगे,स्वप्नील सावंत,दीपक होवाळ,लकी कांबळे,कपिल बनसोडे, वैभव काटे,विनोद कसबे,अक्षय बनसोडे,सचिन उबाळे,

समाधान होवाळ, अक्षय वाघमारे, राजू बनसोडे, धनु बनसोडे, चैतन्य बनसोडे , संदीप वाघमारे, निलेश होवाळ, संदीप वाघमारे, प्रफुल्ल माने, निरज चंदनशिवे, माऊली धांडोरे,अमोल ढोबळे,किरण सावंत, 

पप्पू ऐवळे, नितीन गोडसे, विनायक गंगणे,सुरज उबाळे , प्रवीण सूर्यगण, समाधान धांडोरे, सुधीर वाघमारे, अक्षय सावंत, राहुल सावंत, संग्राम मोरे, सिद्धनाथ काटे, सह आदी कार्यकर्ते व युवक व महिला सुद्धा मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments