सांगोला तालुक्यात पुन्हा मुसळधार पाऊस; २७ घरांची पडझड, तीन जनावरांचा मृत्यू ३० हजार हेक्टरवरील डाळिंब बागा उध्दवस्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला तालुक्यात शुक्रवार (दि. 27) रात्रीपासून शनिवारी (दि. 28) दिवसभर पुन्हा मुसळधार पाऊस झाला. या पावसामुळे तालुक्यातील तब्बल 27 घरांची पडझड झाली
असून, 3 जनावरे दगावली. या पावसामुळे अंदाजे 30 हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे.
या मुसळधार पावसामुळे अंदाजे ३० हजार हेक्टर क्षेत्रातील पिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. जनावरांच्या चाऱ्याची टंचाई निर्माण झाली असून मुरघास खड्ड्यांमध्ये पाणी गेल्याने मोठ्या प्रमाणात चारा वाया गेला आहे.
पावसामुळे झालेल्या नुकसानीची आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख व तहसीलदार संतोष कणसे यांनी गावोगावी जाऊन पाहणी केली. या वेळी त्यांनी शेतकरी व नागरिकांना नुकसानभरपाई देण्याची हमी दिली.
पावसामुळे आणि छोटे मोठे रस्त्यांवर पाणी आल्यामुळे काही वेळासाठी रस्ते बंद पडले होते. जवळा-सांगोला तसेच धायटी-शिवणे असे मार्ग वाहतुकीसाठी बंद होते.
तालुक्यातील दुष्काळग्रस्त परिस्थितीत झालेल्या या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढावले आहे. शेतमाल, चारा, घरांची पडझड यामुळे शेतकरी हवालदिल झाले असून तातडीने शासकीय मदतीची गरज आहे.
शहरातील विविध रस्त्यांवर मोठ्या प्रमाणावर पाणी साचले होते त्यामुळे शहरवासी यांचे अतिशय हाल झाले. तालुक्यातील
डाळिंब, केळी, पेरू, ड्रॅगन फ्रुट अशा विविध फळबागांमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. फळपिकांसह मका पिकाचे नुकसान झाले आहे.
बुद्धीहाळ जलसिंचन प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यातून पाणी सोडण्यात येत आहे. परिणामी गौडवाडी, बुद्धीहाळ, उदनवाडी, पाचेगाव,
हातीद, चोपडी या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पुलावरून पाणी वाहत असल्याने अनावश्यक प्रवास टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
तालुक्यात विविध गावांतील नागरिकांच्या घरांची झाली पडझड -
चिकमहुद-पांडुरंग बाबू बंडगर, भारत दत्तात्रय भोसले, कराडवाडी-आकाराम आलदर, किडेबिसरी-सिताबाई ढाळे, दयानंद साबळे, पौर्णिमा साबळे, घेरडी-दत्तात्रय घुटुकडे, पोपट करे, गोरजनी पाटील, मशाकसो पाटील, खेडू जाधव,
गिरीश चंदनशिवे, शंकर गंड, राजुरी-प्रकाश दबडे, बाबासाहेब व्हरगर, कोंबडवाडी-संतोष सरगर, पाचेगाव बु.-वसंत काबुगडे, चोपडी-दगडू जगताप,
जुजारपूर-अमृत पाटील, जवळा-ललिता साळे, वाणी चिंचाळे-सुखदेव घुणे, कोळा-नारायण इमडे, बलवडी-छाया यादव, डिकसळ-तुकाराम करांडे, बापू भुसनर, अशोक निळे, औदुंबर निळे, तसेच विठ्ठल मोहीते यांची घरे पडली आहेत.
तीन जनावरांचा मृत्यू -
मांजरी : अंगद जगताप यांची जर्सी गाय
कारंडेवाडी बु : सुधाकर बाबा टोणे यांची शेळी
वझरे : प्रकाश पाटील यांचा रेडकू


0 Comments