google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि इंटरनॅशनल वाय.एम.सी.ए.मुंबईमध्ये रंगला थरार कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके स्मृती राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा

Breaking News

सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि इंटरनॅशनल वाय.एम.सी.ए.मुंबईमध्ये रंगला थरार कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके स्मृती राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा

सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि इंटरनॅशनल वाय.एम.सी.ए.मुंबईमध्ये


रंगला थरार कै.गुरुवर्य चं.वि.तथा बापूसाहेब झपके स्मृती राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला (वार्ताहर) सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशन आणि वाय.एम.सी.ए.मुंबई या दोन्ही संघादरम्यान पार पडलेल्या चित्तवर्धक सामन्यांमध्ये सांगोला तालुका बास्केटबॉल असोसिएशनच्या जहीर शेख, अजित मोरे

, विनीत दिघे, डॉ.शैलेश डोंबे, संदेश पलसे या सांगोल्यातील खेळाडूंनी सामन्यांमध्ये चुरस निर्माण केली परंतु शेवटच्या काही मिनिटात इंटरनॅशनल वाय.एम.सी.ए.मुंबईच्या प्लेयर्सनी जिगरबाज खेळ दाखवत 68 विरुद्ध 59 या गुणांनी निसटता विजय मिळवला.

एस.एस.आय.सोलापूर विरुद्ध श्री केरला वर्मा कॉलेज, त्रिसूर, केरळ या दोन्ही संघादरम्यान झालेल्या सामन्यांमध्ये सोलापूर विरुद्ध त्रिसूरच्या टीमने 53 गुण मिळवत विजय मिळवला.

दुपारच्या सत्रात वाय.एम.सी.ए.घाटकोपर, मुंबई विरुद्ध कलबुर्गी बास्केटबॉल टीम, कर्नाटका या दोन्ही संघादरम्यान झालेल्या चुरशीच्या सामन्यांमध्ये घाटकोपर मुंबईने 76 विरुद्ध 70 गुण संपादन करत तर

श्री भानूतालीम संस्था, मिरज विरुद्ध प्रिन्स युनायटेड, कोल्हापूर या दोन संघादरम्यान झालेल्या सामन्यामध्ये मिरज संघाने 36 विरुद्ध 58 गुण संपादन करत विजय मिळवला.

सायंकाळच्या सत्रात जय हिंद जिमखाना, कडा, बीड विरुद्ध पिंपरी चिंचवड बॉईज, पुणे या सामन्या दरम्यान कडा संघाने 51 विरुद्ध 75 गुण मिळवत दणदणीत विजय मिळवला.

वरील चुरशीच्या सामन्यांमध्ये इर्शाद बागवान यांनी आपल्या धमाकेदार शैलीत समालोचन करत सामन्यांमध्ये रंगत आणली.

खेळाडूंच्या चपळदार हालचालींवर बारकाईने लक्ष ठेवून सलीम शेख, अजिम नदाफ, कपिल पाटील, सचिन गायकवाड, झाकी एल., सुफियान पी., मस्जिद, विशाल एम्., रमिज के., या पंचांनी व्हिसल्सच्या सहाय्याने सामने नियंत्रित केले.

Post a Comment

0 Comments