google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके ४४ वा.स्मृतीसमारोह विविध कार्यक्रमांनी होणार संपन्न .

Breaking News

कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके ४४ वा.स्मृतीसमारोह विविध कार्यक्रमांनी होणार संपन्न .

 कै.गुरूवर्य बापूसाहेब झपके ४४ वा.स्मृतीसमारोह विविध कार्यक्रमांनी होणार संपन्न .


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)




  सांगोला (प्रतिनिधी) सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे संस्थापक अध्यक्ष, थोर स्वातंत्र्यसेनानी, सांगोला तालुक्यात माध्यमिक शिक्षणाची सुविधा सर्वप्रथम प्रदान करणारे



 शिक्षणमहर्षि व सांगोला,नाझरा,कोळा विद्यामंदिर प्रशालेचे जनक कै.गुरुवर्य चं. वि. तथा बापूसाहेब झपके ४४ वा.स्मृतीसमारोह २०२५ विविध कार्यक्रमांनी संपन्न होत आहे.

यामध्ये मंगळवार दि.९ सप्टेंबर २०२५ रोजी ८ वी ते १०वी व ११वी १२ वी गट जिल्ह्यास्तरीय वक्तृत्व स्पर्धा व बुधवार दि.१० सप्टेंबर २०२५ रोजी ५ वी ते ७ वी गट तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धा संपन्न झाल्या आहेत.

तसेच दि.१२ सप्टेंबर ते १४ सप्टेंबर २०२५ रोजी पुरूषांच्या निमंत्रित राष्ट्रीय बास्केटबॉल स्पर्धा संपन्न होणार आहेत. या स्पर्धेचा उद्घाटन समारंभ पदवीधर मतदार संघ,पुणे विभागाचे आमदार अरुण (अण्णा) लाड यांचे शुभहस्ते , सांगोला विधानसभा सदस्य 

 आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांचे अध्यक्षतेखाली व उपसंचालक क्रीडा व युवक सेवा पुणे युवराज नाईक, जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर नरेंद्र पवार,मुख्य क्रीडा कार्यकारी 

अधिकारी दत्तात्रय वरकड यांचे प्रमुख उपस्थितीत शुक्रवार दि.१२ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ठीक १०.०० वा.सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे संपन्न होणार आहे.

 तसेच या स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ रविवार दि.१४ सप्टेंबर २०२५ रोजी सायं.५.००वा आंतरराष्ट्रीय धावपटू, उपायुक्त-महानगरपालिका नवी मुंबई ललिता बाबर यांचे शुभहस्ते व 

कर्णधार,विश्वविजेता भारतीय महिला खो-खो संघ व क्रीडा कार्यकारी अधिकारी, महाराष्ट्र राज्य कु.प्रियंका इंगळे यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे.

या कार्यक्रमासाठी उद्योगपती सिद्धार्थ झपके,विलास क्षीरसागर,सुहास होनराव,ज्ञानेश्वर तेली ,नागेश तेली,श्रीकांत देशपांडे,मंगेश म्हमाणे,रत्नाकर ठोंबरे यांची उपस्थिती आहे.

    मंगळवार दिनांक १६ सप्टेंबर २०२५ रोजी सकाळी ७.०० वा.समाधी दर्शन, ८.०० वा.सांगोला विद्यामंदिर सांगोला येथे कै.बापूसाहेब झपके यांचे तैलचित्रास पुष्पहार समर्पित करण्यात येणार आहे

 व सकाळी १० वाजता कै. गुरुवर्य बापूसाहेब झपके स्मृती समारोह सांगता समारंभ प्रमुख पाहुणे राहुल गिरी प्रसिद्ध व्याख्याते बीड यांचे शुभहस्ते व संस्थाध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचे अध्यक्षतेखाली संपन्न होणार आहे. 

या समारंभामध्ये कै.गुरुवर्य बापूसाहेब झपके जिल्हास्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार वितरण होणार असल्याची माहिती सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी पत्रकार परिषदेत दिली.

यावेळी संस्था सचिव मल्लिकार्जुन घोंगडे, खजिनदार शंकरराव सावंत, प्राचार्य अमोल गायकवाड व विविध वृत्तपत्राचे पत्रकार उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments