ज्या पशुपालकांची जनावरे लंपी रोगाने दगावलेली आहेत त्यांना अनुदान द्यावे अशी
मागणी आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख यांनी मंत्री पंकजाताई मुंडे यांच्या कडे केली
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
गेले कित्येक दिवस लंपी रोगाने अनेक जनावरे दगालेली आहेत.एकतर शेती व्यवसाय काहीसा अडचणीत असताना,बहुतांश शेतकरी शेतीसोबत जोड व्यवसाय म्हणून दुध व्यवसायाकडे वळलेला असताना.
जनावरांच्या लंपी रोगाच्या प्रादुर्भावामुळे शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे.लंपी रोगाने अनेक शेतकरी -पशुपालकांची जनावरे दगावली आहेत.या लंपी रोगाने दगावलेल्या जनावरांची संख्या पहाता शेतकरी पशुपालक-चिंतेत आहे.
दुधाच्या व्यवसायावर कसाबसा आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत असताना, लंपी रोगासारख्या संकटाने पशुपालक शेतकरी आर्थिक अडचणीत सापडला आहे अशांना सरकारने अनुदान रुपी आर्थिक मदत जाहीर करण्याची मागणी
आमदार डॉ भाई बाबासाहेब देशमुख यांनी राज्याच्या पशुसंवर्धन मंत्री मा.पंकजाताई मुंडे यांची मंत्रालय येथे भेट घेऊन लेखी स्वरूपात मागणी केली


0 Comments