धक्कादायक..सांगोला तालुक्यातील महूद- पंढरपूर रोडवर कार-दुचाकी अपघातात तरुण ठार
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२८२०८२८४६४७)
सांगोला : भरधाव जाणाऱ्या कारने दुचाकीला पाठीमागून जोराची धडक दिल्याने अपघातात गंभीर जखमी झालेल्या तरुणाचा पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला.
ही घटना ३१ जुलै रोजी दुपारी १२:३० च्या सुमारास महूद- पंढरपूर रोडवरील ओढ्याजवळ घडली होती. पांडुरंग हनुमंत खताळ (वय २४, रा. सोनके, ता. पंढरपूर असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत समाधान महादेव श्रीराम (रा. वाकी शिवणे, ता. सांगोला) यांनी फिर्याद दिली, पोलिसांनी आझाद शेख (रा. सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.
फिर्यादी समाधान श्रीराम यांचे मेव्हणे पांडुरंग खताळ हा एम एच-१३-सीजी-९८६९ या दुचाकीवरून सोनके येथून महूदकडे निघाला होता. त्यावेळी त्याच्यासोबत फिर्यादी पत्नीसोबत
दुचाकीवरून जात होते. त्यांची दुचाकी महूद गावच्या ओढ्याजवळ आली असता यांच्या पंढरपूरकडून भरधाव येणाऱ्या एमएच १२ ईजी ७८३४ या कारने पाठीमागून पांडुरंग खताळ दुचाकीला जोराची धडक
दिल्याने हा अपघात घडला. यात पांडुरंग यास गंभीर मार लागून जखमी झाल्याने फिर्यादी समाधान श्रीराम यांनी तातडीने उपचारासाठी त्यास पंढरपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले होते.
पांडुरंग खताळ हा दुचाकीवरून सोनके येथून महूदकडे जाताना ओढ्याजवळ झाला अपघात


0 Comments