खळबळजनक..सांगोला तालुक्यातील शिरभावी ते हलदहिवडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ
११०० किलो मांस वाहनासह जप्त; गुन्हा दाखल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला : बेकायदेशीररीत्या जनावराचे
मांस वाहतूक करताना पोलिसांनी चारचाकी वाहन पकडून सुमारे ७२ हजार रुपयांच्या ११०० किलो मांसासह पाच लाख रुपयांचे वाहन जप्त केले.
ही कारवाई गुरुवारी पहाटे ५:२०च्या सुमारास शिरभावी ते हलदहिवडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ केली.
याबाबत, पोलिस कॉन्स्टेबल समाधान कळकुंबे यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी मोईनुद्दीन ईसाक तांबोळी (रा. सातवचौक, बारामती),
आवेज जैनुद्दीन काझी (रा. खंडोबानगर चौक, बारामती, जि. पुणे) तसेच आरीफ बासुद्दीन शेख (रा. शिरभावी, ता. सांगोला) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या
आदेशान्वये पोलिस हेड कॉन्स्टेबल नवनाथ कोकरे, पोलिस कॉन्स्टेबल लक्ष्मण वाघमोडे, रमेश कांबळे आणि समाधान कळकुंबे यांनी गुरुवारी पहाटे पाचच्या सुमारास शिरभावी येथील हलदहिवडी रोडवरील पाण्याच्या टाकीजवळ सापळा
रचून शिरभावीकडून येणाऱ्या एमएच-४८-सीबी-३६६७ पत्रा पॅक बॉडी चारचाकी वाहनाची तपासणी केली. यावेळी पाठीमागील हौद्यात लाल ताडपत्रीखाली झाकून ठेवलेले मांस आढळून आले.
पोलिसांनी चालकाकडे कागदपत्राची मागणी करून सदरचे मांस कोठून आणले याची चौकशी केली असता त्याने सुरुवातीला उडवाउडवीचे उत्तरे दिली. नंतर शिरभावी येथील आरीफ बासुद्दीन शेख याच्याकडून आणल्याचे सांगितले.


0 Comments