google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात वंदे मातरम् चौक ते क्रीडा संकुल रस्त्यावर व्यावसायिक अतिक्रमण

Breaking News

सांगोला शहरात वंदे मातरम् चौक ते क्रीडा संकुल रस्त्यावर व्यावसायिक अतिक्रमण

सांगोला शहरात वंदे मातरम् चौक ते क्रीडा संकुल रस्त्यावर व्यावसायिक अतिक्रमण


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला : वंदे मातरम् चौक ते क्रीडा संकुलाच्या रस्त्यापर्यंत बाह्यवळण रस्त्याच्या दुतर्फा व्यावस्वयिकांनी केलेली अतिक्रमणे व रस्त्यातर बांधलेल्या जनावरांमुळे रात्री-अपरात्री वाहतुकीला अढवळा निर्माण झाला आहे. 

सांगोला नगर परिषदेकडून रस्त्यावरील अतिक्रमणे काढून बाद्वावळण रस्ता वाहतुकीसाठी सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांसह वाहनधारकांतून होत आहे.

सांगोला वंदे मातरम् चौक ते मिरज रेल्वे गेटपर्यंत सुमारे ८ कोटी निधीतून १.३३० किमी बाद्वावळण कॉक्रिटीकरण रस्त्याचे काम दोन-तीन ठिकाणी वगळता जवळपास पूर्ण झाले आहे. 

दरम्यान, संजयनगर येथील व्यवसायिकांनी वंदे मातरम् चौक ते क्रीडा संकुलाच्या बाह्यवळण रस्त्यापर्यंत दुतर्फा ठिकठिकाणी भंगार साहित्य, हातगाडे, जुन्या सायकली, दुचाकी, प्लास्टिकच्या रिकाम्या बाटल्या, छापल्या 

असे साहित्य रस्त्याच्या बाजूने ठेवल्या आहेत तर याच व्यावसायिकांची जनावरेही नेहमी सस्त्यावरच बांधलेली असतात, जनावरांचे शेण, मलमूत्र रस्त्यावरच पडलेले असते. 

त्यामुळे कोटचवधी रुपये खर्चुन कॉंक्रिटीकरण केलेला रस्ता नेमका व्यावसायिकांच्या सोयीसाठी तयार केला आहे की, वाहनधारकांच्या सोयीसाठी असा बहुतांश बाह्यक्ळण रस्ता तयार झाल्यामुळे 

अकलूज व मिरज कडून येणारी अवजड वाहने, शहर व उपनगरातील नागरिक याच बाह्यवळण रस्त्याचा वापर करत आहेत. रस्त्यावरील अतिक्रमणामुळे वाहनधारकांना कसरत करूनच वाहने चालवावी लागतात.

 अशावेळी अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही. नगर परिषदेकडून सदर व्याठसायिकांना सूचना देऊन बाद्वावळण रस्ता अतिक्रमणमुक्त करावा, अशी मागणी केली जात आहे.

चौकट 

संजयनगर येथील रहिवाशांनी रस्त्यालगत शासकीय जागेवर केलेली अतिक्रमणे ही वस्तुस्थिती आहे. वारंवार सूचना करूनही रहिवासी ऐकत नाहीत. नगरपरिषद कर्मचारी पाठवून बाहेर रस्ता अतिक्रमणमुक्त केला जाईल.

Post a Comment

0 Comments