google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 चिंचोली रोडवरील अनधिकृत डाळिंब व्यवहार का बंद होत नाही?; कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी कोणाच्या दबावाखाली?

Breaking News

चिंचोली रोडवरील अनधिकृत डाळिंब व्यवहार का बंद होत नाही?; कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी कोणाच्या दबावाखाली?

चिंचोली रोडवरील अनधिकृत डाळिंब व्यवहार का बंद होत नाही?; कृषी उत्पन्न बाजार समिती अधिकारी कोणाच्या दबावाखाली?

सांगोला /करण मोरे (शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष ९५०३४८७८१२)




 सांगोला तालुक्यातील चिंचोली रोडवर सुरू असलेला अनधिकृत डाळिंब व्यापार दिवसेंदिवस बिनधास्तपणे सुरू आहे. अनेक वेळा निवेदने, तक्रारी आणि उपोषणाचे पत्र  करूनही 

हा व्यवहार अद्याप बंद झाला नसल्याने नागरिकांत तीव्र नाराजी आहे. या व्यवहारामागे कोणाचा छुपा वरदहस्त आहे, याबाबत संशय व्यक्त केला जात आहे.

विशेष म्हणजे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संबंधित अधिकारी कोणाच्या तरी दबावाखाली असल्यामुळे कारवाईस टाळाटाळ करत असल्याचे बोलले जात आहे. 

ही बाब अधिक गंभीर ठरते कारण कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुक्यातील इतर प्रशासनिक अधिकारी 

सांगोला तालुक्यावर कोणताही राजकीय अथवा अन्य दबाव नाही, असे वेळोवेळी सांगतात. मग असे असताना ही कारवाई का होत नाही, असा प्रश्न आता शेतकरी आणि नागरिक विचारू लागले आहेत.

या संदर्भात स्थानिकांकडून असा आरोप केला जात आहे की, काही शक्तिशाली एजंटांच्या आणि व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच ही दुर्लक्षनीती राबवली जात आहे. 

स्थानिक प्रशासनाने आणि कृषी विभागाने तातडीने या प्रकरणाची सखोल चौकशी करून कारवाई करावी, अशी मागणी जोर धरू लागली आहे.

जर लवकरच यावर ठोस पावले उचलली गेली नाहीत, तर शेतकरी संघटनांकडून  15 ऑगस्ट रोजी उपोषणाचा इशारा दिला जात आहे.

Post a Comment

0 Comments