google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 आमदार बाबासाहेब देशमुख यांनी नामदार नितीनजी गडकरी यांची विकास कामाबाबत घेतली भेट

Breaking News

आमदार बाबासाहेब देशमुख यांनी नामदार नितीनजी गडकरी यांची विकास कामाबाबत घेतली भेट

आमदार बाबासाहेब देशमुख यांनी नामदार नितीनजी गडकरी यांची विकास कामाबाबत  घेतली भेट


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार डाॅ.भाई बाबासाहेब देशमुख यांनी आज नवी दिल्ली येथे

 केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री मा.ना.नितीनजी गडकरी साहेब यांची सांगोला विधानसभा मतदारसंघातील प्रलंबित प्रश्नांबाबत भेट घेतली. 

  यावेळी आमदार बाबासाहेब देशमुख यांनी सांगोला विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांना निधी देण्याची मागणी केली...

तसेच सांगोला विधानसभा मतदार संघातील प्रलंबीत कामे आहेत त्याही कामांना केंद्राचा निधी देण्याची मागणी आमदार साहेबांनी नामदार गडकरी साहेबांकडे केली. 

झालेल्या चर्चेतून मा.मंत्री महोदय नितीनजी गडकरी साहेबांनी विकासासाठी कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नसल्याचे सांगीतले. स्व.आमदार गणपतरावजी देशमुख

 ऊर्फ आबासाहेब यांच्या बद्दल संपुर्ण राज्याला‌ गर्व असुन त्यांच्या आमदारकीच्या कार्यकाळात ते माझ्याकडे यायचे व विकासाचे प्रश्न उपस्थित करायचे आता सुध्दा आपल्या मतदार संघातील विकास कामांना योग्य ती मदत करणार

 असल्याचे सांगून  प्रलंबीत प्रश्न  लवकरात लवकर  मार्गी लावण्याचे आश्वासन दिले व  संबंधित विभागांच्या अधिकाऱ्यांना त्याबाबत मंत्री आर ना.नितीनजी गडकरी यांनी   निर्देश दिले.

सदर भेटी दरम्यान चेअरमन समाधान पाटील व प्रा.किरण पवार हे उपस्थित आसल्याची माहीती प्रसिध्दी प्रमुख भाई चंद्रकांत सरतापे यांनी दिली

Post a Comment

0 Comments