google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 स्व.गणपतराव देशमुख यांची जयंती श्रमिक दिन म्हणून साजरी होणार..डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल,ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

Breaking News

स्व.गणपतराव देशमुख यांची जयंती श्रमिक दिन म्हणून साजरी होणार..डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल,ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन

स्व.गणपतराव देशमुख यांची जयंती श्रमिक दिन म्हणून साजरी होणार..डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय व न्यू इंग्लिश स्कूल,ज्युनिअर कॉलेज सांगोला येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

10 ऑगस्ट हा दिवस स्व.डॉ. गणपतराव देशमुख यांची जयंती सांगोला तालुकाच नव्हे तर सर्वत्र  "श्रमिक दिन" म्हणून साजरी केली जाते, याचे औचित्य साधून  डॉ.गणपतराव देशमुख महाविद्यालय  

व न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज सांगोला यांच्या संयुक्त विद्यमाने दि 11, 12 व 13 ऑगस्ट 25  रोजी स्व. डॉ. गणपतराव देशमुख यांच्या 98 व्या जयंतीनिमित्त म्हणजेच श्रमिक दिनानिमित्त  विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

 यामध्ये सोमवार दिनांक 11 ऑगस्ट सकाळी 8ते 2 वाजेपर्यंत रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले असून याच दिवशी सकाळी आठ वाजता तालुकास्तरीय वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

 उच्च माध्यमिक व महाविद्यालयीन गट यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावयाचा आहे 

अशा विद्यार्थ्यांनी प्रा डॉ. किसन माने (9423327411) यांच्याशी तर दुपारी बारा वाजता माध्यमिक विभाग या गटामध्ये सहभाग घ्यावयाचा अशा विद्यार्थ्यांनी श्रीरंग बंडगर सर  (97 66 18 31 81 ) यांच्याशी संपर्क साधावा.

     तर मंगळवार दिनांक12 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता रंगभरण स्पर्धा फक्त सांगोला शहरातील इयत्ता चौथी मधील विद्यार्थी साठी मर्यादित आहे. या स्पर्धेसाठी विद्यार्थी संख्येची अट नाही. 

ज्या विद्यार्थ्यांना स्पर्धेमध्ये सहभाग घ्यायचा अशा विद्यार्थ्यांनी प्रा. सौ.  मीनाक्षी धुरे (99 60 86 01 53 ) यांच्याशी तर सकाळी 11 वाजता लोकनृत्य स्पर्धा इयत्ता पहिली ते चौथी गट , पाचवी ते सातवी गट, इयत्ता आठवी ते दहावी गट, 

उच्च माध्यमिक गट आणि महाविद्यालयीन गट यामध्ये ज्या विद्यार्थ्यांना सहभाग घ्यावयाचा आहे,  अशा विद्यार्थ्यांनी प्रा अशोक वाकडे (94 04 67 0816) व प्रा चंद्रप्रभा माने मॅडम (86 00 65 87 17) यांच्याशी संपर्क साधावा.

   तसेच बुधवार दिनांक 13 ऑगस्ट सकाळी 06:30 वाजता राज्यस्तरीय मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये ज्या स्पर्धकांना सहभाग घ्यावयाचा आहे, अशा स्पर्धकांनी  प्रा विजय पवार (98 22 37 66 64)

 व प्रा हिंमत साळुंखे (72 77 11 77 71) यांच्याशी संपर्क साधावा. तर सकाळी 09:00  वाजता पारितोषिक वितरण सोहळ्याच्या आयोजन करण्यात आले आहे. या पारितोषिक वितरण सोहळ्यास 

प्रमुख पाहुणे म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत  मा.प्रा.व. बा. बोधे तर कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ सांगोला चे संस्था अध्यक्ष मा डॉ अनिकेत (भैय्या) देशमुख हे  उपस्थित राहणार आहेत.

    या विविध कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्यासाठी सांगोला तालुका व परिसरातील विद्यार्थी, विद्यार्थिनींनी व नागरिकांनी सहभागी व्हावे, असे आवाहन प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी व न्यू इंग्लिश स्कूलचे प्राचार्य प्रा. केशव माने  

व न्यू इंग्लिश स्कूल पूर्व प्राथमिक व प्राथमिकचे प्राचार्य श्री. दिनेश शिंदे सर तसेच कार्यक्रमाचे संयोजक प्रा. अशोक कांबळे यांनी केले आहे. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.

Post a Comment

0 Comments