google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कमलापूर गावचे सुपुत्र,पुण्याचे उद्योजक अशोक आदलिंगे यांनी शालेय विद्यार्थ्यांना 1000 वह्याचे वाटप उद्योजक अशोक भाऊ आदलिंगे यांचा वंचितांना एक हात मदतीचा सातत्याने

Breaking News

कमलापूर गावचे सुपुत्र,पुण्याचे उद्योजक अशोक आदलिंगे यांनी शालेय विद्यार्थ्यांना 1000 वह्याचे वाटप उद्योजक अशोक भाऊ आदलिंगे यांचा वंचितांना एक हात मदतीचा सातत्याने

कमलापूर गावचे सुपुत्र,पुण्याचे उद्योजक अशोक आदलिंगे  यांनी शालेय


विद्यार्थ्यांना 1000 वह्याचे  वाटप उद्योजक अशोक भाऊ आदलिंगे यांचा वंचितांना एक हात मदतीचा सातत्याने

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

 कमलापूर प्रतिनिधी   : कमलापूर गावचे सुपुत्र,कर्मभूमी  पुणे येथे असलेले यशस्वी उद्योजक अशोक आदलिंगे (श्री.अशोक वॉटरप्रूफिंग  कंपनी) यांनी कमलापूर पंचक्रोशी मध्ये  तसेच 

आटपाडी येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये 79 व्या स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून 1000 विद्यार्थ्यांना वह्याचे  वाटप  मोफत करण्यात आले. माणूस किती जरी मोठा झाला

 तरी ज्या परिस्थितीतून ज्या गावातून ज्या भूमीतून जन्माला आलो. ज्या भूमीचे ऋण फेडले पाहिजेत. ही भावना सातत्याने आहे.आपण ज्या परिस्थितीत जन्माला आलो संघर्ष केला तीच परिस्थिती इतरांच्या पदरी आली नाही पाहिजे.

 आपणही समाजाचे देणे लागतो.हीच प्रामाणिक भावना अशोक भाऊंची वेळोवेळी जाणवली.कमलापूरचे नाव  पुण्यासारख्या वेगाने वाढणाऱ्या गतिमान शहरामध्ये आपला नावलौकिक मिळवला. 

अशोक भाऊ आदलिंगे यांची पार्श्वभूमी  अतिशय गरिबीची व हालाखीची होती. त्यांचे वडील मोलमजुरी व शेतमजुरी   मुलांना गरीब परिस्थितीतून कसेबसे शिक्षण पूर्ण केले.

घरची परिस्थिती अतिशय बेताची वडिलांनी परिवाराचा गाडा हाकत हाकत संघर्षमय जीवन जगून अशोक भाऊ सारख्या लोकांना घडवलं.अशोक भाऊ आदलिंगे यांचे जन्मस्थान जरी कमलापूर असले तरी 

 कर्मभूमी पुणे आहे. वीस पंचवीस वर्षांपूर्वी 

 पुणे येथे नोकरीच्या शोधार्थ पुणे गाठले. सुरुवातीला सेंट्रींग कामगार म्हणून अशोक भाऊ आदलिंगे यांनी काम पार पाडले. पुढे

 बांधकाम व्यवसायातील श्री अशोका वॉटरप्रूफिंग कंपनीच्या पुणे येथे बांधकाम 

 व्यवसायामध्ये  एक वेगळे स्थान निर्माण केले आहे. अशोका वॉटरप्रूफिंग कंपनीमध्ये सध्या 380 कामगार कार्यरत आहेत.तसेच पुणे येथे आदर्शवत शैक्षणिक संकुल ही चालू केले आहे. 684 विद्यार्थी

 शिक्षणाचे धडे गिरवतात.एवढेच नाही 

 कमलापूर गावाच्या  सामाजिक,आर्थिक, धार्मिक शैक्षणिक क्षेत्रांमध्ये  नेहमीच मदतीचा हात पुढे करतात.आपली जन्मभूमी कमलापूर असली तरी एवढ्या उंच क्षेत्रामध्ये गरुड भरारी घेतल्यानंतर 

 आपल्या गावावर ही नेहमी  माया व आशीर्वाद असतो. हे त्यांच्या वेळोवेळी कृतीतून दिसून येते. मागील वर्षी  शालेय विद्यार्थ्यांसाठी  510  शालेय बॅगचे वितरण करण्यात आले होते.

           चौकट

 आमची परिस्थिती अतिशय नाजूक होती. आम्ही  लोकांचे कष्ट काम करून पोरांना शिकवलं. आमच्या पोरांना पुरते कपडे व वह्याही नव्हत्या. पण आमच्या अशोकच्या  रूपाने गोरगरीब पोरांना शालेय वाटप होत आहे याचा मला मनोमन आनंद आहे. पोरांनीही चांगले शिकले पाहिजे.

    पारूबाई महादेव आदलिंगे

    ( अशोक(भाऊ)आदलिंगे यांच्या मातोश्री)

Post a Comment

0 Comments