सांगोला तालुक्यातील जवळा गावात जुगार अड्ड्यावर पोलिसांचा छापा आठ जणांवर गुन्हा दाखल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)
सांगोला (प्रतिनिधी) : सांगोला तालुक्यातील जवळा गावात पोलिसांनी पत्त्यांच्या जुगार अड्ड्यावर छापा टाकून आठ जणांना ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी तब्बल ₹26,410/- किमतीचा मुद्देमाल, त्यात रोख रक्कम आणि पत्त्यांचा संच जप्त केला आहे.
ही कारवाई दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी सायंकाळी 5.55 वाजता सांगोला पोलीसांनी केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी मोहन दगडु बंडगर (रा. शिरनांदगी),
अंकुश बलभीम पाटील (रा. शिरनांदगी), सचिन महादेव शेंडगे (रा. मेडशिंगी), दिपक गोरख बाबर (रा. मानेगाव), धनाजी नामदेव गेडगे (रा. घेरडी), विशाल दगडू सुरवसे (रा. जवळा), सुरेश पांडुरंग उरवणे
(रा. जवळा) व भारत तात्याबा बुरुंगले (रा. घेरडी) हे सर्वजण जवळा-घेरडी रोडवरील मुक्ताई ट्रेडर्स दुकानाजवळ उंबाऱ्याच्या झाडाखाली पत्त्यांच्या पानांवर पैशांची पैज लावून मंत्रा नावाचा जुगार खेळताना आढळले.
यावेळी पोलिसांनी सर्व आरोपींकडून ₹26,410/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला असून त्यामध्ये रोख रक्कम व पत्ते यांचा समावेश आहे.
या प्रकरणी सांगोला पोलीस ठाण्यात गु. र. नं. 668/2025 महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम कलम 12(अ) अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ/741 बोधगिरे व पोहेकाॅ भोसले करीत आहेत.
0 Comments