google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भीषण आपघाथ..सांगोला येथे पिकअप-दुचाकीची जोराची धडक; 1 जण ठार

Breaking News

भीषण आपघाथ..सांगोला येथे पिकअप-दुचाकीची जोराची धडक; 1 जण ठार

भीषण आपघाथ..सांगोला येथे पिकअप-दुचाकीची जोराची धडक; 1 जण ठार


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला – रविवार आठवड्याचा बाजार करून घराकडे परतणार्‍या दुचाकीला समोरून भरधाव येणार्‍या पिकअपने दुचाकीला विरुद्ध बाजूने जोराची धडक दिली.

अपघातात दुचाकीस्वाराचा गंभीर जखमी झाल्याने उपचारापूर्वी मृत्यू झाला.हा अपघात काल रविवारी दुपारी 4 च्या सुमारास सांगोला- पंढरपूर रोडवरील देशमुख वस्ती जवळ घडला.

संतोष धोंडीराम जाधव रा बामणी ता सांगोला असे मृताचे नाव आहे दरम्यान अपघातानंतर पिकअप चालकाने घटनास्थळावरून धूम ठोकली.याबाबत समाधान जाधव रा.बामणी ता.सांगोला

 यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी अज्ञात पिकअप चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला .फिर्यादी, समाधान जाधव याचा भाऊ संतोष जाधव काल रविवारी 

सांगोला येथील आठवड्याचा बाजार करून तो दुपारी चारच्या सुमारास दुचाकीवरून सांगोला ते पंढरपूर रोडने बामणी घराकडे निघाला होता त्याची दुचाकी देशमुख वस्ती जवळ आली असता नेमके

 पंढरपूर कडून भरधाव वेगाने येणार्‍या पिकअपने विरुद्ध बाजूने येऊन दुचाकीला समोरून जोराची धडक दिल्याने हा अपघात घडला. अपघातात संतोष जाधव यांच्या डोकीस छातीस व उजवा पाय गुडघ्यापासून तुटून गंभीर दुखापत

 झाल्याने त्यास भाऊ समाधान जाधव यांनी पोलिसांच्या मदतीने तातडीने उपचाराकरता सांगोला ग्रामीण रुग्णालय दाखल केले असता तेथील डॉक्टरांनी तपासून त्याचा उपचारापुर्वी मृत्यू झाल्याचे सांगितले. 

घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक बाबासाहेब भातुगडे , पोलीस हेड कॉन्स्टेबल विलास बनसोडे पोलीस कॉन्स्टेबल दिपक घोंगडे यांनी अपघातस्थळी धाव घेऊन जखमीस मदत केली.

Post a Comment

0 Comments