google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला शहरात विद्यानगरमध्ये इंग्लिश मीडियम स्कूलकडे जाणारा रस्ता चिखलमय; विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त

Breaking News

सांगोला शहरात विद्यानगरमध्ये इंग्लिश मीडियम स्कूलकडे जाणारा रस्ता चिखलमय; विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त

सांगोला शहरात विद्यानगरमध्ये इंग्लिश मीडियम स्कूलकडे जाणारा रस्ता चिखलमय; विद्यार्थ्यांसह नागरिक त्रस्त



(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२/८२०८२८४६४७)

सांगोला / करण मोरे विद्यानगर परिसरातील इंग्लिश मीडियम स्कूल ‘विद्यामंदिर’कडे जाणारा मुख्य रस्ता 

सध्या पूर्णपणे चिखलमय व पाणथळ झाला आहे. पावसामुळे रस्त्यावर खोल खड्डे तयार होऊन चिखलाचे साम्राज्य पसरले आहे. 

त्यामुळे शाळेत जाणाऱ्या लहानग्या विद्यार्थ्यांपासून स्थानिक नागरिकांपर्यंत सर्वांनाच प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

पावसाच्या पाण्यामुळे खड्ड्यांमध्ये साचलेले पाणी वाहनचालकांसाठी धोकादायक ठरत असून, दोन चाकी व चार चाकी वाहनांना वेग कमी करून खबरदारीने मार्ग काढावा लागत आहे. 

पायी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना चिखलातून चालत शाळेत पोहोचावे लागत असल्याने त्यांचा त्रास अधिकच वाढला आहे.

पालकांनी वारंवार रस्त्याच्या दुरुस्तीसाठी प्रशासनाकडे मागणी केली असली तरी अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. 

अशा परिस्थितीत विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे.

स्थानिक नागरिकांनी तातडीने रस्त्याची दुरुस्ती करून विद्यार्थ्यांना सुरक्षित व सोयीस्कर मार्ग उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. 

अन्यथा ही समस्या अधिक गंभीर होऊन अपघातांच्या घटना घडण्याची शक्यता नागरिक व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments