google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक! 'जातीवाचक अवहेलना करून लग्नास नकार; प्रेयसीने संपवले जीवन'; चौघांविरुद्ध गुन्हा, पंढरपूर तालुक्यातील घटना

Breaking News

धक्कादायक! 'जातीवाचक अवहेलना करून लग्नास नकार; प्रेयसीने संपवले जीवन'; चौघांविरुद्ध गुन्हा, पंढरपूर तालुक्यातील घटना

धक्कादायक! 'जातीवाचक अवहेलना करून लग्नास नकार;


प्रेयसीने संपवले जीवन'; चौघांविरुद्ध गुन्हा, पंढरपूर तालुक्यातील घटना

पंढरपूर : जातीवाचक अवहेलना करून लग्नास नकार दिल्याने तरुणीने विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली.

 ही घटना गादेगाव (ता. पंढरपूर) येथे रविवारी (ता. ६) दुपारी घडली. याप्रकरणी पंढरपूर ग्रामीण पोलिस ठाण्यात स्वाती नारायण साळुंखे या महिलेने फिर्याद दिली आहे.

याप्रकरणी कुलदीप सिद्धनाथ बागल, सिद्धनाथ बागल यांच्यासह कुलदीपची आई आणि भाऊ अशा चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आरोपी कुलदीप बागल याचे फिर्यादीच्या भाचीशी वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. त्यामुळे फिर्यादीच्या नातेवाईकांनी आरोपीकडे मुलीबरोबर लग्न कर असा आग्रह धरला होता. आरोपीने जातीवाचक अवहेलना करून लग्न करणार नाही, असे सांगितले.

जातीवाचक शिवीगाळ करून अपमान केला. त्या नैराश्येतून तरुणीने विष प्राशन करून आत्महत्या केली.

 आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी वरील आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. अर्जून भोसले हे करीत आहेत.

Post a Comment

0 Comments