google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 संतापजनक.. माता झाली वैरी! ४ वर्षीय मुलीच्या नरड्यावर पाय दिला अन्., लेकीला अमानुष मारहाण

Breaking News

संतापजनक.. माता झाली वैरी! ४ वर्षीय मुलीच्या नरड्यावर पाय दिला अन्., लेकीला अमानुष मारहाण

संतापजनक.. माता झाली वैरी! ४ वर्षीय मुलीच्या नरड्यावर पाय दिला अन्., लेकीला अमानुष मारहाण


सोशल मीडियावर मन हेलावून घटना व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये जन्मदाताच आई चार वर्षीय मुलीला अमानुष मारहाण करताना दिसत आहे. 

या व्हायरल व्हिडीओनंतर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.नेमकी काय आहे घटना ? जाणून घेऊया..

ठाणे जिल्ह्यातील दिवा विभाग समिती अंतर्गत येणाऱ्या साबेगाव म्हात्रे इमारतीत राहणाऱ्या गोडीमेटले कुटुंबातील २८ वर्षीय यशोदा ब्रह्मया हिने तिच्या साडेचार वर्षीय 

चिमुकलीला स्टीलच्या चमच्याने बेदम मारहाण केली आणि या मारहाणीचा व्हिडीओ त्याच आईच्या मोठ्या मुलगीने मोबाईल मध्ये कैद केला आहे. 

ती महिला या लहान मुलीला उलातण्याने मारते, तिच्या गळ्यावर पाय देते. तिला फरफटत बाहेर घेऊन जाते आणि पुन्हा मारहाण करते. यामध्ये चक्क ते उलातणे तुटते. ही घटना पाहणाऱ्या प्रत्येकाचे काळीज पिळवटून टाकणारी आहे.

चोरट्यांची पण कमाल! वॉशरूमच्या खिडकीतून प्रवेश केला अन्…

मिळालेल्या माहितीनुसार, यशोदा ब्रह्मया हिने तिच्या साडेचार वर्षीय मुलीला स्टीलच्या चमच्याने बेदम मारहाण केली. कुटुंबातील इतर सदस्यांनी महिलेला थांबवण्याचा प्रयत्न केला,

 महिला आणि मुलीनेमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. पण तरीही महिलेने मारणे सुरूच ठेवले. महिलेच्या मोठ्या मुलीने अखेर तिच्या मोबाईलवर मारहाणीचा व्हिडिओ बनवला.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि महिलेला मुंब्रा पोलीस ठाण्यात आणून त्याचा जबाब नोंदवला आहे. तसेच साडेचार वर्षीय चिमुकलीच्या आजीने दिलेल्या फिर्यादीनुसा यशोदा ब्रह्मया 28 वर्षीय आई वरती

 भारतीय न्याय संहिता कलम ११५(२), ११८(१), ७५ बालसंरक्षण अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच हा तपास मुंब्रा पोलीस स्टेशन PSI अनिल सोनवणे यांच्या माध्यमातून करण्यात येत आहे.

साडेचार वर्षीय चिमुकलेला बेदम मारहाण करणारी आई यशोदा ब्राह्मया हिला नोटीस देण्यात आली आहे. मुलीला महिला व बालकल्याण समिती उल्हासनगर या ठिकाणी पाठवण्यात आलेला आहे

 आणि पुढील तपास मुंब्रा पोलीस स्टेशनच्या माध्यमातून करण्यात येत आहे. मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

या प्रकरणी संबंधित प्रशासन आणि पोलिस यंत्रणांनी तत्काळ लक्ष घालण्याची गरज असून सोशल मीडियावर लोक संतप्त प्रतिक्रिया देत आहेत.

 'अशा महिलेला कठोर शिक्षा झाली पाहिजे,', 'चिमुकलीचा गुन्हा तरी काय?', अशा अनेक प्रतिक्रियांनी सोशल मीडियाचे पान भरून गेले आहे. 

तथ्यांची खात्री झाल्यानंतर संबंधित महिलेविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. बालहक्क संरक्षण आयोगाकडून सुद्धा या प्रकरणाची गंभीर दखल घेण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Post a Comment

0 Comments