google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मिरज– कलबुर्गी– मिरज यात्रा स्पेशल रेल्वेस मुदतवाढ मिळावी:–अशोक कामटे संघटना

Breaking News

मिरज– कलबुर्गी– मिरज यात्रा स्पेशल रेल्वेस मुदतवाढ मिळावी:–अशोक कामटे संघटना

मिरज– कलबुर्गी– मिरज यात्रा स्पेशल रेल्वेस  मुदतवाढ मिळावी:–अशोक कामटे संघटना


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुका प्रतिनिधी कलबुर्गी,सोलापुर,सांगली व कोल्हापुर जिल्ह्यातील प्रवासी संघटनांची मागणी

 पंढरपूर येथील आषाढी एकादशीनिमित्त मध्य रेल्वे कडून गाडी क्रमांक 01107 & 01108 मिरज– कलबुर्गी– मिरज रेल्वे दिनांक 1 जुलै ते 10 जुलै 2025 या कालावधीत यात्रा स्पेशल धावत/ सुरू आहे .या रेल्वेस नियमित्त/मुदतवाढ करावी 

अशी मागणी कोल्हापूर, मिरज सोलापूर व कलबुर्गी येथील सर्व प्रवासी संघटनांनी रेल्वे विभागाकडे केली असल्याची माहिती अशोक कामटे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष निलकंठ शिंदे सर यांनी दिली.

यात्रा स्पेशल 01209 & 01210 कोल्हापूर– कुर्डूवाडी– कोल्हापूर , किंवा मिरज कलबुर्गी या दोन्हीपैकी एक रेल्वे नियमित सुरू करावी.

सर्व थांबे असल्याने सर्वसामान्य प्रवाशांकरिता अत्यंत सोयीची सोयीस्कर वेळ, रेल्वे असल्याने 11 जुलैपासून त्यानंतरच्या काळात सदर रेल्वेस मुदतवाढ मिळावी , तसेच यात्रा कालावधीत

 या रेल्वेस भाविक भक्तांनी,प्रवाशांनी उत्तम प्रतिसाद दिला आहे.तसेच सदर रेल्वेचा रेक नवीन व शिल्लक राहत असल्याने याचा उपयोग या मार्गासाठी करावा. तसेच सकाळी सत्रात कोल्हापूर पासून अशी सोलापूर पर्यंत

 कोणतीही थेट रेल्वे नसल्याने सदरची रेल्वे सर्वांना सोयीस्कर असल्याचे प्रवाशांचा आग्रह आहे , किमान या रेल्वेस मुदतवाढ मिळावी किंवा नियमित ,दररोज  सोडण्याकरिता  किशोर भोरावत,

शिवनाथ बियाणी, सुरेश भोसले, संदीप शिंदे, हर्षद मोरे, निलकंठ शिंदे सर , बाबा निंबाळकर, गणेश डोंगरे, संजय पाटील, संजय चौगुले, शशिकांत पाटील, तुळजाराम भोरे हे मध्य रेल्वेचे सल्लागार समितीचे 

सदस्य व कोल्हापूर ,मिरज– सांगली, सोलापूर व कलबुर्गी जिल्ह्यातील सर्व संघटनेचे पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. तसेच या रेल्वेस "देवदर्शन एक्सप्रेस "असे नाव देण्यात यावे. ही मागणी देखील प्रामुख्याने करण्यात आली. निवेदनाच्या प्रती 

मा. जयकुमार गोरे ,पालकमंत्री (सोलापूर जिल्हा),

खासदार धैर्यशील मोहिते– पाटील ,

खासदार विशाल पाटील , खासदार धनंजय महाडिक,

खासदार प्रणितीताई शिंदे, आमदार सुरेशभाऊ खाडे, आमदार बसवराज मतिमूड( गुलबर्गा ग्रामीण)

 विभागीय रेल्वे व्यवस्थापक ,मध्य रेल्वे पुणे ,सोलापूर

 मा. चेतनसिंह केदार– सावंत (भाजपा जिल्हाध्यक्ष सोलापूर) यांनाही देण्यात आल्या आहेत. तरी रेल्वे प्रशासनाने ही प्रवाशांची मागणी विचारत घेऊन या रेल्वेस मुदतवाढ देण्यात यावी अशी सर्व संघटनांची मागणी आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई येथील झोनल मीटिंगमध्ये माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते–पाटील यांनी मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक यांच्याकडे याबाबतची आग्रही मागणी केली आहे त्यानुसार मध्य रेल्वे विभाग मुंबई यांच्याकडून सकारात्मक निर्णय होईल

 असे मोहिते –पाटील यांनी सांगितले. व अशोक कामटे संघटना याकरिता सातत्याने रेल्वे विभागाशी पाठपुरावा करीत आहे.त्यामुळे सोलापूर सह इतर तीन जिल्ह्यातील प्रवाशांची मोठी सोय होणार आहे .

निलकंठ शिंदे सर यांनी यावेळी सांगितले.

Post a Comment

0 Comments