google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. करमाळा तालुक्यातील अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

Breaking News

मोठी बातमी.. करमाळा तालुक्यातील अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश

मोठी बातमी.. करमाळा तालुक्यातील अनेक नेत्यांचा भाजपमध्ये प्रवेश 


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला तालुका प्रतिनिधी): करमाळा तालुक्यातील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ सर, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन देवी गटाचे नेते कन्हैयालाल देवी यांनी महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, 

ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे, माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर, भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत, भाजप महिला प्रदेश उपाध्यक्षा रश्मी बागल, जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे यांच्या उपस्थितीमध्ये 

मुंबई येथील भाजप प्रदेश कार्यालयामध्ये भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला. यावेळी करमाळा तालुक्यातील सर्व भाजपचे पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

        करमाळा तालुक्यामध्ये भारतीय जनता पक्षाचे काम घराघरापर्यंत पोचून आगामी जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका निवडणुकीमध्ये भाजपचे कमळ फुलण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस, प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, पालकमंत्री जयकुमार गोरे, 

माजी खासदार रणजीतसिंह निंबाळकर जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वजण एक दिलाने काम करणार असल्याचे प्रवेश केलेल्या नेत्यांनी सांगितले. करमाळा तालुक्यामध्ये भाजपची ताकद वाढली आहे.

      करमाळा तालुक्यातील दत्तकला शिक्षण संस्थेचे अध्यक्ष प्राध्यापक रामदास झोळ, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन तथा देवी गटाचे नेते कन्हैयालाल देवी, दत्तकला दत्तकला 

शिक्षण संस्थेच्या सचिवा माया झोळ, जिल्हा काँग्रेस संघटक हरिभाऊ मंगवडे, श्रीकांत साखरे, मकाई साखर कारखान्याचे संचालक सुभाष शिंदे, हरिभाऊ झिंगाडे, आदिनाथ साखर कारखान्याचे संचालक दत्तात्रय जगदाळे, 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हा कार्याध्यक्ष रवींद्र गोडगे, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते गणेश मंगवडे, प्रहार जनशक्तीचे जिल्हा सरचिटणीस बापुराव तळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष हनुमंत मांढरे पाटील, 

भोसे गावचे सरपंच प्रीतम सुरवसे, कोंढार चिंचोली गावचे सरपंच शरद भोसले, खातगावचे सरपंच अविनाश मोरे, कुंभारगावचे सरपंच रामदास पोळ, रामवाडीचे सरपंच गौरव झांजुर्णे, खडकी गावचे सरपंच उमाकांत बरडे, वाशिंबेचे 

माजी सरपंच अनुरथ झोळ, पोटेगावचे सरपंच संतोष भागडे, पोथरे गावचे माजी सरपंच विष्णू रंदवे, रामवाडीचे माजी सरपंच बाळासाहेब गरगुंड, पोटेगावचे माजी सरपंच प्रशांत नाईकनवरे, मिरघवन विकास सेवा 

सोसायटीचे चेअरमन चंद्रसेन घरबुडे, भोसेचे उपसरपंच हनुमंत वारे, कोंढार चिंचोली गावचे उपसरपंच रोहिदास साळुंखे, स्वाभिमानी शेतकरी कामगार संघटनेचे तालुकाध्यक्ष सुहास काळे पाटील, 

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तालुका उपाध्यक्ष निलेश शिंदे, वीट गावचे माजी सरपंच शांतीलाल जाधव, करमाळा अर्बन बँकेचे व्हाइस चेअरमन गोरक्ष जाधव, संचालक मोहिनीराज भणगे, प्रकाश सोळंकी, 

चंद्रकांत चुंबळकर, समाजसेवक हितेश कटारिया, माजी नगरसेवक रामदास जाधव, ज्येष्ठ समाजसेवक लक्ष्मणसिंग परदेशी, समाजसेवक अक्षय जाधव, समाजसेवक कमलाकर घोलप यांनी भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.

Post a Comment

0 Comments