आमदार बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्याला आले यश... १,२,३ अथवा ४,५ गुंठ्याची सुध्दा खरेदी विक्री होणार..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला :- गेले अनेक दिवस गुंठेवारीची खरेदी विक्री होत न्हवती.आता सर्वसामांन्य नागरिकांना खरेदी केलेल्या एक, दोन, तीन किंवा चार पाच गुंठे क्षेत्राचे तुकडे नियमित करण्यास
प्रांतधिकाऱ्यांकडुन परवानगी दिली जाणार आहे.२०१७ साली केलेल्या सुधारणेनुसार१९६५ ते २०१७ या कालावधीत झालेल्या झालेल्या तुकड्याचे व्यवहार नियमीत करण्यासाठी
बाजार मुल्याच्या २५ टक्के रक्कम शासनाकडे शुल्क म्हणुन भरणे बंधनकारक होते.ही रक्कम समांन्य नागरीकांना जास्तीची होत असल्याने अनेक खरेदी व्यवहार बंद होते..त्यामुळे सामांन्यांना एक दोन तिन किंवा चार-पाच गुंठे खरेदी करता येत न्हवती.
सांगोला विधानसभा मतदार संघात सुध्दा अनेक छोट्या गु़ंठेवारीचे व्यवहार ठप्प होते. अनेक सामान्य नागरीकांना आशा गुंठ्याची खरेदी करता येत नसल्याने अडचण निर्माण झालेली होती.या बाबीचा विचार करुन सांगोला विधानसभा मतदार संघाचे
लोकप्रिय आमदार बाबासाहेब देशमुख यांनी अनेक वेळा शासनाकडे पाठपुरावा केलेला होता.मा.मख्यमंत्री देवेंद्र फडणविस साहेब व महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कडे लेखी पत्राद्वारे मागणी केली होती त्या मागणीस
आज यश आले आहे.
एक दोन तिन किंवा चार- पाच गुंठ्याचे खरेदी होणार आहे.सदर गुंठ्याचे व्यवहार हे खरेदी व्यवहाराच्या (दस्त रेडिरेकनच्या )पाच टक्के रक्कम शुल्क म्हणुन शासनाला भरावी लागणार
आसुन त्या यानंतर त्या गुंठ्यात विहिर ,घर व रस्त्यासाठी परवानगी दिली जाईल.आसे राज्याचे महसुल मंत्री मा.चंद्रशेखर बावनकुळे यांनी सभागृहात आज जाहीर केले...
सदर निर्णय झाल्याने नागरीकांना दिलासा मिळाला असुन..आमदार बाबासाहेबांचे कौतुक नागरीकामधुन होत माहीती चंद्रकांत सरतापे यांनी दीली
0 Comments