सलग ७ शासकीय पदांवर यशस्वी ठरलेली शितल नकाते आता वर्ग १ अधिकारी ; सांगोल्याच्या शितलची गगनभरारी !
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला ( प्रतिनिधी )- सांगोला येथील जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग सांगोला शाखा अभियंता बाळासाहेब नकाते यांची कन्या कु. शितल बाळासाहेब नकाते यांनी सलग ७ परीक्षेत यश मिळवत एमपीएससी मार्फत २०२३ (MES) मध्ये
घेतल्या गेलेल्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले असून त्यांची वॉटर रिसोर्सेस डिपार्टमेंट (डब्ल्यू.आर.डी.) मध्ये सहाय्यक अभियंता वर्ग १- अधिकारी पदी निवड झाली आहे.
कु. शितल नकाते यांचे २ री पर्यंत प्राथमिक शिक्षण जि.प. शाळा, नकातेवाडी येथे, ३ री, ४ थी – उकर्ष प्राथमिक विदयालय, सांगोला येथे तर ५ वी ते १२वी शिक्षण न्यू इंग्लिश ज्यू.कॉ. सांगोला येथे झाले.
त्यांना १० वी ला ९२. ४० टक्के, १२ वी ला ८७. ५४ टक्के गुण मिळाले. डिग्री शिक्षण राजारामबापू इन्स्टिटयूट ऑफ टेक, इस्लामपूर येथे झाले. त्या गेट २०२४ मध्ये क्वालिफाइड झाल्या.
सिव्हिल इंजिनिअरिंग मध्ये डिग्री घेतल्यानंतर जून २०१९ पासून ते जानेवारी २०२४ दरम्यान स्पर्धा परीक्षा तयारी केली. त्यानंतर दिलेल्या विविध परीक्षेतुन एकूण ७ सरकारी पोस्ट (खुल्या गटातून) त्यांनी मिळविल्या.
भूमिअभिलेख – २०२१, शिल्प निदेशक २०२२, सोलापूर महानगर कनिष्ट अभियंता -२०२३, पिंपरी चिंचवड महानगरपालिका कनिष्ट अभियंता – २०२२, नगरपालिका कनिष्ठ अभियंता २०२३, सहाय्यक अभियंता वर्ग-२ एमपीएससी २०२२,
(MES-Maharashtra engineering Service) आदी पदाला गवसनी घातल्यानंतर एमपीएससी २०२३ (MES) सहाय्यक अभियंता वर्ग – १ या पदावर त्यांनी घवघवीत यश संपादन करत क्लास वन पदाचे स्वप्न पूर्ण केले.
सध्या सर्वेअर ट्रेड साठी क्राफ्ट इन्स्ट्रक्टर म्हणून शासकीय तंत्रनिकेतन संस्था औंध पुणे येथे कार्यरत आहेत. कु. शितल नकाते यांच्या या यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत असून अभिनंदन होत आहे.
0 Comments