मोठी बातमी..सांगोला तालुक्यात स्कूटीवरून बेकायदेशीर विदेशी दारूची तस्करी; सांगोल्यात आरोपी जेरबंद..
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला/प्रतिनिधी: सांगोला तालुक्यातील जवळा गावाच्या हद्दीत पेट्रोलिंग दरम्यान पोलिसांनी एका इसमाच्या स्कूटीतून बेकायदेशीर परवानगीशिवाय देशी-विदेशी दारूची तस्करी पकडली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी एका इसमाला अटक करून सुमारे ५३,८३५ रुपये किमतीचा मुद्देमाल दिनांक ५ जुलै रोजी रात्री ९.३० वाजता जप्त केला आहे.
पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांच्या आदेशानुसार पोलीस हवालदार सदाम रसुल नदाफ व त्यांच्या सहकाऱ्यांनी पेट्रोलिंग करत असताना मौजे जवळा येथे गोपनीय बातमीच्या आधारे ही कारवाई केली. यावेळी रस्त्याच्या कडेला एक काळ्या रंगाची हिरो
कंपनीची प्लेझर स्कूटी (MH13 BZ 5040) थांबवून उभी असलेली दिसली. संशय आल्याने पोलिसांनी पंचासमक्ष स्कूटीची तपासणी केली असता, त्यामध्ये विविध देशी व विदेशी दारूच्या सीलबंद बाटल्या आढळून आल्या.
या कारवाईत आरोपी सुरज चंद्रकांत सागर (वय २९, रा. माळवाडी, सांगोला) याला ताब्यात घेण्यात आले.चौकशीदरम्यान त्याने सदर दारू जवळा गावातील प्रमोद साळुंखे पाटील यांच्या वाईन शॉपमधून खरेदी केल्याचे सांगितले.
जप्त केलेल्या मुद्देमालात ब्लेंडर्स प्राईड, रॉयल स्टॅग, डीएसपी ब्लॅक, ग्रीन लेबल, गोवा लेमन्स, बी-7 स्टर्लिंग रिझर्व्ह आदी ब्रँडच्या बाटल्यांचा समावेश आहे.
पोलीसांनी स्कूटीसह देशी-विदेशी दारूच्या एकूण ५३,८३५/- रुपये किमतीच्या बाटल्या जप्त करून, नमुन्याच्या बाटल्या वेगळ्या काढून पंचनाम्यानंतर माल पोलिस ठाण्यात जमा केला आहे.
या प्रकरणी आरोपीविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सांगोला पोलीस करत आहेत.
चौकट :
वाईन शॉप मधून बेकायदेशीर परवानगीविना देशी विदेशी दारू पकडल्याने सांगोला पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक विनोद घुगे आणि त्यांच्या टीमचे कौतुक केले जात आहे.
त्या भागातील राजकीय वरदहस्त लाभलेल्या युवा नेत्याच्या वाईन शॉप मधून विदेशी व देशी मद्य घेवून जाताना
कारवाई केल्याने एकच खळबळ उडाली आहे. सबंधित वाईन शॉप मधून दररोज अशा पद्धतीचा बेकायदेशीर देशी विदेशी दारूच्या बाटल्या विक्रीसाठी मोठ्या प्रमाणात घेवून जात
असल्याचे त्या भागातील नागरिकांनी सांगितले. जवळा भागातील या कारवाई बरोबरच शहर आणि तालुक्यात अशीच कारवाई करावी अशी मागणी नागरिकांतून केली जात आहे.
0 Comments