पंढरपूर हादरले; पत्नीला कलाकेंद्रात नाचायला पाठवलं, दिराने केली भावजयीची हत्या
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात हादरवून टाकणारी घटना घडली आहे.
पत्नीला कला केंद्रावर नाचण्यासाठी पाठविल्याचा गैरसमज करून घेत सासरच्या मंडळींकडून भयानक कृत्य करण्यात आले आहे.
खंडागळे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल डॉक्टर परेश खंडागळे यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबिर व मोफत शिबिर आरोग्य तपासणी पहा विडिओ..
यात सावत्र दिराने महिलेच्या मानेवर कुऱ्हाडीने प्रहार करत हत्या केली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणी तपास करत आहेत.
पंढरपूर तालुक्यातील करकंब गावात सदरची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेत हेमा आकाश काळे असं खून झालेल्या महिलेचे नाव आहे. तर हेमा काळे
या महिलेचा सावत्र दीर मुकुंदराजा यांच्यासह सावत्र सासू आणि सासरा यांनी कुऱ्हाडीने वार करून खून केला आहे.
दरम्यान हा घटनेत मुकुंदराजा याची पत्नी मागील एक महिन्यापासून जामखेड येथे कला केंद्रावर नाचण्याकरिता जात होती.
संशयातून केली हत्या
आपल्या पत्नीला सावत्र जाऊ मयत हेमा हिने शिकवून पाठविल्याचा संशय मुकुंदराजा याच्या मनात होता. यामुळे दीर मुकुंदराजा आणि सावत्र सासू, सासरा हे
सर्वजण आकाश आणि त्याची पत्नी हेमा यांच्यावर संतप्त झालेले होते.
याच रागातून मुकुंदराजा याने सावत्र भावजय हेमा हिच्या मानेवर कुऱ्हाडीने घाव घालत हत्या केली आहे.
घटनेची माहिती मिळताच करकंब पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून या प्रकरणी पोलीस तपास करत आहेत.
0 Comments