google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 कमलापूर गावची शेतकरी कन्या अमृता खटके हिचे NEET परीक्षेत घवघवीत यश लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सन्मान

Breaking News

कमलापूर गावची शेतकरी कन्या अमृता खटके हिचे NEET परीक्षेत घवघवीत यश लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सन्मान

कमलापूर गावची शेतकरी कन्या अमृता खटके हिचे NEET परीक्षेत घवघवीत यश


लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते सन्मान

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

 कमलापूर प्रतिनिधी  कमलापूर गावची सुकन्या कुमारी अमृता अनिल खटके  हिने  MBBS मेडिकलसाठी आवश्यक असणारी  प्रवेश पात्र परीक्षा अर्थात NEET नीट परीक्षेत 574 गुण मिळवून घवघवीत यश संपादित केले आहे. 

त्याबद्दल तिचा सत्कार  लोकप्रिय आमदार डॉ.बाबासाहेब देशमुख यांच्या हस्ते संपन्न झाला.अमृता हिचे  प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कमलापूर येथे  पूर्ण केले. 

त्यानंतर माध्यमिक शिक्षण आनंद विद्यालय कमलापूर येथे पूर्ण केले. इयत्ता अकरावी बारावीचे उच्च माध्यमिकचे शिक्षण  लिगाडे - पाटील ज्युनिअर कॉलेज कराड येथे पूर्ण केले.तिने नीटची पूर्ण तयारी लिगाडे-पाटील अकॅडमी येथे केली. 

अमृता ही लहानपणापासूनच अतिशय शांत हुशार  मुलगी होती.तिची घरची परिस्थिती अतिशय नाजूक आणि बेताची आहे.अमृता हिला घरातूनच शिक्षणाचे धडे मिळाले अमृताचे वडील  अनिल बिरा खटके हे लहानपणापासून

 सर्व मुलांचा अतिशय अतिशय बारकावे हेरून नियमित अभ्यास घेत असत.अल्पभूधारक शेतकरी आहेत. शेतकरी कन्येने मेडिकलसाठी आवश्यक असणाऱ्या नीट परीक्षेत मिळवलेलं यश उत्तुंग यश आहे. 

अमृताच्या यशामध्ये तिचे वडील,चुलते सुनील खटके, चुलत बंधू डॉ.सतीश खटके माऊली हॉस्पिटल सांगोला यांचंही वेळोवेळी सहकार्य लाभले.सदर सत्कार समारंभामध्ये कुमारी माधवी धर्मराज टकले

 हिस NEET परीक्षेत 456, तसेच CET परीक्षेत कुमारी तनुजा सुनील खटके, कुमारी अस्मिता श्रीमंत टकले घवघवीत यश मिळाल्याबद्दल सत्कार संपन्न झाला सर्व पदाधिकारी,प्रतिष्ठित नागरिक यावेळी उपस्थित  कमलापूर गावातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

0 Comments