google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 ब्रेकिंग न्यूज..सांगोला मार्केट यार्ड मध्ये डाळिंबाची उघड लिलावाद्वारे विक्री; शेतकर्‍यांनी डाळिंब शेतमाल मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणावा

Breaking News

ब्रेकिंग न्यूज..सांगोला मार्केट यार्ड मध्ये डाळिंबाची उघड लिलावाद्वारे विक्री; शेतकर्‍यांनी डाळिंब शेतमाल मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणावा

ब्रेकिंग न्यूज..सांगोला मार्केट यार्ड मध्ये डाळिंबाची उघड लिलावाद्वारे विक्री; शेतकर्‍यांनी डाळिंब शेतमाल मार्केट यार्डमध्ये विक्रीसाठी आणावा


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला(प्रतिनिधी):- सांगोला मार्केट यार्ड मध्ये डाळिंबाची उघड लिलावाद्वारे विक्री होत असल्यामुळे शेतकर्‍यांचे फसवणूक होत नाही तरी शेतकर्‍यांनी 

आपला डाळिंब शेतमाल विक्रीसाठी जास्तीत जास्त प्रमाणात मार्केट यार्ड सांगोला येथे आणावा असे आवाहन सभापती समाधान पाटील व सचिव श्री उत्तम खोकले यांनी केले आहे.

सांगोला कृषी उत्पन्न बाजार समितीच्या डाळींब मार्केटमध्ये दिनांक 21 जून 2025 रोजी 5000 क्रेट पर्यंत आवक झालेली आहे. 

सदर आवक झालेल्या भगव्या जातीच्या डाळिंबास निलाव बोलीमध्ये किमान 80 रुपये पासून 150 रुपये प्रति किलो पर्यंत विक्री दर मिळाला आहे. 

तसेच मार्केट यार्ड मध्ये डाळिंब खरेदी विक्रीची दररोजची उलाढाल 25 ते 30 लाखापर्यंत होत असून शेतकर्‍यांच्या डाळिंबाला चांगला दर मिळत असल्यामुळे शेतकर्‍यांमध्ये आनंदचे वातावरण आहे.

Post a Comment

0 Comments