google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खळबळजनक प्रकार! सासूकडून देण्यात आलेल्या शिव्याशापानंतर सूनेने उचलले टोकाचे पाऊल, मंगळवेढ्यातील घटना; सून हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती...

Breaking News

खळबळजनक प्रकार! सासूकडून देण्यात आलेल्या शिव्याशापानंतर सूनेने उचलले टोकाचे पाऊल, मंगळवेढ्यातील घटना; सून हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती...

खळबळजनक प्रकार! सासूकडून देण्यात आलेल्या शिव्याशापानंतर सूनेने उचलले


टोकाचे पाऊल, मंगळवेढ्यातील घटना; सून हॉस्पिटलमध्ये दाखल, प्रकृती...

सासूकडून देण्यात आलेल्या शिव्याशापानंतर सूनेने टोकाचे पाऊल उचलले. झोपेच्या गोळ्या खाऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. हा प्रकार मंगळवेढा येथील नागणेवाडी येथे शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास घडला.

माधुरी अविनाश चौधरी (वय २६, रा. नागणेवाडी ता. मंगळवेढा) असे सुनेचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी सहाच्या सुमारास माधुरी हिला तिची सासू शोभा बाजीराव अवघडे हिने, माझ्या मुलाचे तू वाटोळे केले, कोठे तरी मर जा असे म्हणून शिवीगाळ केली.

यानंतर माधुरी हिने झोपेच्या सहा गोळ्या खाल्ल्याने तिला चक्कर येण्याचा त्रास होऊ लागला.

मंगळवेढा येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचार करण्यासाठी सिव्हिल रुग्णालयात उपचारास दाखल केले. विवाहितेची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. याची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

कर्ज फेडण्यासाठी २ लाखांची मागणी करत विवाहितेचा छळ; पतीसह सासरच्या तिघांवर गुन्हा दाखल

विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेऊन कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये घेवून ये म्हणत विवाहितेचा छळ केला व दुसऱ्या महिलेशी विवाह केल्याप्रकरणी पतीसह तिघांवर सदर बझार पोलिसांत गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत उमा सुरेश वड्डेपल्ली (वय ३३ रा. ३८ न्यू जगजीवनराम झोपडपट्टी सोलापूर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती सुरेश वड्डेपल्ली,

सासू नागप्पा व जमुना बोगे (रा. ५३४ नवीन विडी घरकुल, कुंभारी सोलापूर) यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. विवाहिता सन २०१२ ते ११ जून २०२१ दरम्यान सासरी नांदत होत्या. आरोपीनी विवाहितेच्या चारित्र्यावर संशय घेतला.

बचत गट काढून कर्ज फेडण्यासाठी दोन लाख रुपये घेवून ये म्हणत पती सुरेश याने उमा यांच्या संमतीविना कमला नावाच्या महिलेशी विवाह केला. उमा हीस मानसिक, 

शारिरीक त्रास देवून मारहाण केली, जीवे मारण्याची धमकी देत माहेरी हाकलून दिल्याचे पोलिसांत दिलेल्या फिर्यादीत म्हटलं आहे.

Post a Comment

0 Comments