google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 भाजपच्या वतीने सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

Breaking News

भाजपच्या वतीने सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा

भाजपच्या वतीने सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा 




(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला (तालुका प्रतिनिधी): भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

         योगसाधनेचे मूळ उगमस्थान भारत देश आहे आणि ग्रामीण भागापासून ते शहरापर्यंत योगाचे महत्व पटवून देणे ही काळाची गरज आहे 

आणि म्हणूनच २१ जून हा उत्तर गोलार्धातील वर्षातील सर्वात मोठा दिवस असतो. तर दक्षिण गोलार्धातील हा दिवस सर्वात लहान असतो. 

त्यामुळे जगभरातील अनेक भागामध्ये या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. परंतु याच दिवशी सूर्याचे दक्षिणायन सुरू होते आणि याच दिवशी सर्वात पहिला योगी म्हणून गणला

 जाणाऱ्या शंकराने योगविषयीचे ज्ञान जगासमोर आणले. म्हणून २१ जून हा आंतरराष्ट्रीय स्तरावर योग्य दिन साजरा करण्यात येतो असे भाजपचे जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांनी सांगितले.

         भारतीय जनता पक्षाच्या वतीने जिल्हाध्यक्ष चेतनसिंह केदार सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापूर ग्रामीण पश्चिम जिल्ह्यात आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात आला.

 सकाळच्या आल्हाददायक वातावरणात योग प्रात्यक्षिकांमध्ये शालेय विद्यार्थ्यांसह तरुण,

 नोकरदार, व्यावसायिक तसेच वेगवेगळ्या क्षेत्रांतील मान्यवर आणि ज्येष्ठ नागरिक सहभागी झाले होते. अनेक 

ठिकाणी विविध क्षेत्रांतील लोकांनी सामूहिक योग कार्यक्रमांत सहभाग घेत निरोगी आयुष्यासाठी योगासने असा संदेश दिला.

Post a Comment

0 Comments