google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक 76 लाख मतदान वाढीच्या विरोधात सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन सांगोला तालुका अध्यक्ष विनोद (भैय्या )उबाळे

Breaking News

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक 76 लाख मतदान वाढीच्या विरोधात सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन सांगोला तालुका अध्यक्ष विनोद (भैय्या )उबाळे

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक 76 लाख मतदान वाढीच्या विरोधात सोलापूर येथे


वंचित बहुजन आघाडीच्या वतीने जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन सांगोला तालुका अध्यक्ष विनोद (भैय्या )उबाळे

(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला/ प्रतिनिधी: महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये आश्चर्यकारक 76 लाख मतदान वाढीच्या विरोधात सोलापूर येथे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीचे फायर ब्रँड नेते सुजात (दादा) आंबेडकर यांच्या उपस्थितीमध्ये

 जन आक्रोश मोर्च्याचे आयोजन दि. 23 रोजी सकाळी 11 वाजता करण्यात आले आहे.

तसेच यामध्ये सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरस्त्र वळविल्या च्या निषेधात, तसेच अनुसूचित जाती जमातीचा निधी इतरत्र वळवता येऊ नये.यासाठी कायदा करावा. अनुसूचित जाती जमातीच्या निधी संदर्भात महाराष्ट्र शासनाने श्वेतपत्रिका काढावी. 

व अनुसूचित जाती जमातीच्या न्याय हक्क अधिकारासाठी या जन आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. तरी या जन आक्रोश मोर्चा साठी सांगोला तालुक्यातून शेकडो कार्यकर्ते  घेऊन जाणार 

असल्याचे वंचित बहुजन आघाडीचे सांगोला तालुका अध्यक्ष विनोद (भैय्या )उबाळे यांनी सांगितले. तसेच तालुक्यातील तमाम वंचित बहुजन आघाडी प्रेमी व आंबेडकरी चळवळीत काम

 करणाऱ्या कार्यकर्त्यांना तसेच  एससी, एसटी,  ओबीसी , सर्व लोकांनी सदरच्या मोर्चात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष विनोद (भैय्या) उबाळे यांनी केले.

Post a Comment

0 Comments