खळबळजनक..सोलापूरमध्ये राष्ट्रवादीच्या नेत्याचं भयानक कांड, महिला एकटी असताना
रूमध्ये शिरला अन्...; महाराष्ट्राला काळिमा फासणारी घटना
सोलापूर :- राष्ट्रवादीच्या नेत्याने केला ४५ वर्षीय महिलेचा दोनदा विनयभंग; आक्षेपार्ह व्हिडीओ व्हायरल, गुन्हा दाखल
राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. सोलापूर येथील शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी महापौर
मनोहर सपाटे यांच्याविरोधात ४५ वर्षीय महिलेने विनयभंगाचा गुन्हा फौजदार चावडी पोलीस ठाण्यात दाखल केला आहे.या प्रकरणातील घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली आहे.
पीडित महिला शेतीच्या वादातील न्यायालयीन प्रकरणासाठी १४ जून रोजी सोलापुरात आली होती. राहण्यासाठी तिने लकी चौकातील शिवपार्वती लॉजमध्ये रूम नं. २०२ बुक केली.
काही दिवसांनंतर तिला रूम नं. २०५ दिली गेली. लॉजचे मालक मनोहर सपाटे यांनी तिच्याशी ओळख करत तिचा मोबाईल क्रमांक घेतला आणि व्हिजिटिंग कार्ड दिले.
पीडितेच्या फिर्यादीनुसार, १६ जून रोजी मध्यरात्री सपाटे यांनी तिच्या रूमचा दरवाजा ठोठावून, जबरदस्तीने आत घुसून दरवाजा बंद केला आणि अश्लील चाळे करत विनयभंग केला.
त्यानंतर, २४ जून रोजी त्यांनी पीडितेला फोन करून रूम नं. ३०७ मध्ये बोलावले. तेथेही त्यांनी पुन्हा तिच्या इच्छेविरुद्ध विनयभंग केला. मात्र या वेळी पीडितेने प्रसंगाचा व्हिडिओ मोबाईलमध्ये शूट करून पुरावा जमा केला.
या सर्व प्रकारानंतर पीडितेने फौजदार चावडी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली, आणि पोलिसांनी मनोहर सपाटे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. सध्या या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
राजकीय वर्तुळात याआधीही महिलांवर अत्याचाराच्या घटनांमुळे वातावरण तापलेले असतानाच, हा नवीन प्रकार समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे.
0 Comments