google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धक्कादायक...शेतीचा वाद; शेतकरी कमालीचा पेटला, रागाच्या भरात रक्तरंजित खेळानं काटा काढला, सोलापुरात काय घडलं?

Breaking News

धक्कादायक...शेतीचा वाद; शेतकरी कमालीचा पेटला, रागाच्या भरात रक्तरंजित खेळानं काटा काढला, सोलापुरात काय घडलं?

धक्कादायक...शेतीचा वाद; शेतकरी कमालीचा पेटला, रागाच्या भरात रक्तरंजित खेळानं काटा काढला, सोलापुरात काय घडलं?


टेंभुर्णी : माढा तालुक्यातील जाखले येथे शेतीच्या वादातून पूर्व वैमनस्यातून रमेश बाबू लोंढे ( वय 56 रा. जाखले ता.माढा ) या शेतकऱ्यांचा धारदार कोयत्याने वार करून हत्या करण्यात आली.

ही घटना गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास जाखले ते रोपळे रस्त्यावरील सुभाष मारूती पवार यांच्या शेताजवळ घडली. 

या हत्येप्रकरणी टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून टेंभुर्णी पोलीसांनी यातील सर्व आरोपींना अटक केली आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जाखले येथील रमेश बाबू लोंढे आणि उत्तम गणपत लोंढे यांच्यात शेतीच्या बांधाच्या कारणाने वाद सुरू होता. एकमेकांच्या विरोधात दोन दिवाणी आणि चार फौजदारी गुन्हे दाखल आहेत. 

या दोघांमध्ये पाऊल वाटेवरून व शेताच्या बांधाच्या कारणाने सतत खटके उडून भांडणे होत होती. 

या गुन्ह्यातील आरोपींनी शेतीच्या तसेच जागेच्या कारणावरुन रमेश लोंढे यांना जीवे ठार मारण्याचा निर्धार केला.

दरम्यान, गुरुवारी सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास रमेश लोंढे हे आपल्या शेतात जात असताना जाखले ते 

रोपळे कच्चा रस्त्यावरील सुभाष मारूती पवार यांच्या शेताजवळ आले. त्यानंतर तेथेच आरोपी रामचंद्र उत्तम लोंढे, ओंकार रामचंद्र लोंढे, 

व अविनाश रामचंद्र लोंढे यांनी धारदार कोयत्याने हल्ला रमेश लोंढे यांच्यावर हल्ला केला. रमेश लोंढे यांच्या मानेवर, पायावर गंभीर वार झाल्याने ते जागेवर कोसळले आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला.

घटनेची माहिती मिळताच टेंभुर्णी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरिक्षक नारायण पवार त्यांच्या सहकार्यांसह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. 

त्यानंतर मयत रमेश लोंढे यांचा मृतदेह टेंभुर्णीतील प्राथमिक आरोग्य केंद्रात शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला. 

या प्रकरणी मयत शेतकऱ्याचा मुलगा उमेश रमेश लोंढे (वय-29 रा. जाखले) याने टेंभुर्णी पोलीस ठाण्यात सहा जणांविरुद्ध फिर्याद दिली

 असून सर्व आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. तसेच पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण पवार हे करीत आहेत.

आरोपींची नावे

या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे उत्तम गणपत लोंढे , बालाजी उत्तम लोंढे (दोघेही रा.वांगी ता.करमाळा), 

रामचंद्र उत्तम लोंढे, अविनाश रामचंद्र लोंढे, ओंकार रामचंद्र लोंढे, उज्वला रामचंद्र लोंढे (चौघेही रा.जाखले ता.माढा) ही आहेत.

Post a Comment

0 Comments