google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बायकोला दागिना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण…

Breaking News

बायकोला दागिना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण…

बायकोला दागिना घ्यायला ९३ वर्षीय आजोबा शहरात आले; पण…


पती-पत्नी सुख-दु:खात एकमेकांना साथ देतात. आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत आपला नवरा किंवा बायको सोबत असावी, अशी इच्छा असते.

 दरम्यान सोशल मीडियावर आजी-आजोबांचा एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. 93 वर्षांचे आजोबा आपल्या पत्नीला गळ्यातील पोत घेण्यासाठी घेऊन जातात.

मोठ्या मुलाच्या मृत्यूमुळे दोघेही खचले आहेत. त्यात दुसऱ्या मुलाच्या दारूच्या व्यसनापायी ते घराबाहेर असतात. मात्र, अशा परिस्थितीत ते दोघे एकमेकांना सोबत घेऊन आहेत. 

शहरात फिरून जे पैसे येतील त्यात गुजराण करतात. मात्र अशाही परिस्थिती ते आपल्या पत्नीची काळजी घ्यायला तिची इच्छा पूर्ण करायचे विसरले नाही.

 पत्नीची इच्छा पूर्ण करण्यासाठी दहा दहा रुपये जमा करून ते ज्वेलरीच्या दुकानात आले आणि बायकोची इच्छा पूर्ण केली. त्यावेळी दुकानदाराने त्यांना ज्या पद्धतीने वागणूक दिली त्याचे खूप कौतुक होत आहे.

छत्रपती संभाजीनगरमधील मंठा तालुक्यातील अंभोरा जहागीर येथील वृद्ध दाम्पत्य छत्रपती संभाजीनगर येथील एका ज्वेलरी दुकानात गेले होते. दुकानात प्रवेश करताच

 कर्मचाऱ्यांना वाटले की, हे वृद्ध पैसे मागण्यासाठी आले असावेत. मात्र, ९३ वर्षीय निवृत्ती सखाराम शिंदे यांनी आपल्या पत्नीसाठी सोन्याची पोत खरेदी करायची आहे, असे सांगितले.

वृद्ध पतीचे आपल्या पत्नीवरील प्रेम पाहून ज्वेलरी दुकानाच्या मालकाने त्यांना खास पोत भेट म्हणून दिली आणि केवळ वीस रुपये ‘आशीर्वाद’ म्हणून घेतले. 

या सौंदर्यपूर्ण क्षणाचा व्हिडिओ दुकानदाराने सोशल मीडियावर शेअर केला असून त्याला 93 वर्षीय बाबांचे त्यांच्या बायकोवरील प्रेम पाहण्यासाठी मिळाले, असे कॅप्शन दिले आहे.

Post a Comment

0 Comments