google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 खुशखबर..लाडकी बहिण योजना: महिलांना आता 1 लाखांचं कर्ज 'शून्य टक्के' व्याजदराने

Breaking News

खुशखबर..लाडकी बहिण योजना: महिलांना आता 1 लाखांचं कर्ज 'शून्य टक्के' व्याजदराने

खुशखबर..लाडकी बहिण योजना: महिलांना आता 1 लाखांचं कर्ज 'शून्य टक्के' व्याजदराने


मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण' योजनेअंतर्गत आता महिलांना आणखी एक मोठा दिलासा मिळणार आहे. या योजनेने आधीच महिलांना घरबसल्या

 आर्थिक हातभार दिला आहे, पण आता त्या महिलांना 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज चक्क शून्य टक्के व्याजदराने मिळणार आहे.

हा निर्णय मुंबई बँकेकडून घेण्यात आला असून, ही बँक भाजप आमदार प्रवीण दरेकर यांच्या अध्यक्षतेखाली कार्यरत आहे. या योजनेचा उद्देश लाडक्या बहिणींना केवळ मदतीपुरता मर्यादित न ठेवता, 

त्यांना उद्योग आणि व्यवसायासाठी प्रोत्साहन देणे हा आहे. त्यामुळेच, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची इच्छा लक्षात घेऊन बँकेने ही महत्वाची घोषणा केली आहे.

यापूर्वी या कर्जासाठी ९ टक्के व्याजदर आकारला जात होता. मात्र आता तो नियम रद्द करण्यात आला असून, बँकेच्या माध्यमातून ० टक्के व्याजदराने कर्ज पुरवण्यात येणार आहे.

 या सवलतीचा लाभ देण्यासाठी राज्य शासनाच्या चार महामंडळांच्या योजनांशी समन्वय साधण्यात आला आहे.

राज्य सरकारच्या 4 महामंडळाच्या योजना अशा आहेत की, 12 टक्क्यांपर्यंतच्या व्याजाचा परतावा लाभार्थींना दिला जातो.

 पर्यटन महामंडळाची आई योजना आहे, ज्या योजनेतून महिलेला 12 टक्क्यांपर्यंत व्याजाचा परतावा दिला जातो.

यासह, अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ, भटक्या विमुक्तांसाठीचे महामंडळ आणि ओबीसी महामंडळांच्या योजनांमधून व्याजाचा परतावा महिलांना दिला जातो.

 त्यामुळे जर कोणतीही महिला या योजनांच्या निकषात बसत असेल, तर तिला प्रत्यक्षात शून्य टक्के व्याजदराने कर्ज मिळू शकते, अशी माहिती दरेकर यांनी दिली आहे.

गोव्यात उत्साहात साजरा झाला ११ वा आंतरराष्ट्रीय योग दिन

'उंची पेंग्विनची, चाल बदकाची, आवाज कोंबडीचा… जीव काय, बोलतोस काय?' ठाकरेंचा नितेश राणेंवर निशाणा!

'उंची पेंग्विनची,आवाज कोंबडीचा…' ठाकरेंच्या टिकेवर राणेंची पहिली प्रतिक्रिया, सर्वच काढलं,'स्वत:चा मुलगा..'

Post a Comment

0 Comments