google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 धकादायक प्रकार! 'नवविवाहिता आठ दिवसांत प्रियकरासोबत पळाली'; आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी, प्रियकराचे तिच्यासाठी कायपण सांगोला तालुक्यातील घटना..

Breaking News

धकादायक प्रकार! 'नवविवाहिता आठ दिवसांत प्रियकरासोबत पळाली'; आई-वडिलांच्या डाेळ्यात पाणी, प्रियकराचे तिच्यासाठी कायपण सांगोला तालुक्यातील घटना..

धकादायक प्रकार! 'नवविवाहिता आठ दिवसांत प्रियकरासोबत पळाली'; आई-वडिलांच्या


डाेळ्यात पाणी, प्रियकराचे तिच्यासाठी कायपण सांगोला तालुक्यातील घटना..

सांगोला:- गावातील मुलासोबत पळून गेलेल्या मुलीला शोधून तिच्या आई-वडिलांनी १८ वर्षे पूर्ण होण्यापूर्वीच विवाह लावून दिला. 

पण, आठ दिवसांतच ती मुलगी त्याच तरुणासोबत पळून गेली. २०२३ मध्ये सांगोला पोलिसांत या प्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

पण, सांगोला पोलिसांना ती अल्पवयीन मुलगी दोन वर्षात सापडलीच नाही. शेवटी, सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक कक्षाने त्या अल्पवयीन मुलीला शोधून काढले.

 त्या तरुणाविरुद्ध पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल झाला असून सध्या तरुण न्यायालयीन कोठडीत आहे.

सांगोला तालुक्यातील एका गावातील अल्पवयीन मुलगी शाळा सोडून घरीच होती. कौटुंबिक स्थिती बेताची असल्याने आई-वडिलांच्या मजुरीवरच कुटुंबाचा उदरनिर्वाह सुरू होता. 

त्या मुलीची गावातील एका तरुणाशी ओळख झाली आणि दोघेजण गुपचूप भेटू, बोलू लागले. 

काही महिन्यांनी दोघांनी आई-वडिलांच्या परस्पर विवाह करण्याचा निर्णय घेतला आणि दोघेही पळून गेले. मुलीच्या आई-वडिलांनी तिला शोधून काढले 

आणि तिचा नात्यातील तरुणाशी विवाह लावून दिला. मुलगी अल्पवयीन असल्याची माहिती असताना देखील त्यांनी तिचा विवाह लावल्याने त्यांच्याविरुद्धच आता बालविवाह प्रतिबंधक कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे.

दरम्यान, विवाहानंतर ती मुलगी सासरमधून पळून गेली आणि त्या प्रियकरासोबत उपरी (ता. पंढरपूर) येथे एका शेतातील वस्तीवर राहू लागले. दोन वर्षे पोलिसांना ते सापडलेच नाहीत. 

हा गुन्हा अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंधक शाखेकडे वर्ग करण्यात आला. सहायक पोलिस उपनिरीक्षक सविता कोकणे यांनी त्यांच्या सहकाऱ्यांच्या मदतीने त्यांचा शोध घेतला आणि त्यांना पकडले. दोघांनाही आता सांगोला पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

मुलाचे तिच्यासाठी कायपण...

२०२३ मध्ये अल्पवयीन मुलीसोबत पळून गेलेल्या तरुणास शोधून पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. त्यावेळी त्याच्याविरुद्ध सांगोला पोलिसांत 'पोक्सो'अंतर्गत गुन्हा दाखल झाला होता. पोलिसांनी त्याला अटक केली होती, 

तो न्यायालयातून जामिनावर सुटला होता. तरीपण, त्याने दुसऱ्यांना त्या अल्पवयीन मुलीला पळवून नेले आणि आता पुन्हा त्याच्याविरुद्ध पूर्वीच्याच कलमांनुसार गुन्हा दाखल झाला असून सध्या तो न्यायालयीन कोठडीत आहे.

Post a Comment

0 Comments