Breaking News

खळबळजनक..सांगोला तालुक्यात अज्ञात चोरट्याने चार तोळे सोन्याचे दागिने केले लंपास.! हटकर मंगेवाडी येथील घटना..

खळबळजनक..सांगोला तालुक्यात अज्ञात चोरट्याने चार तोळे सोन्याचे दागिने केले लंपास.! हटकर मंगेवाडी येथील घटना..


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला / तालुका प्रतिनिधी अंघोळीला जाताना बांधरुम बाहेर काढुन ठेवलेले सोन्याची म ोहनमाळ व बोरमाळ अज्ञात चोरट्याने पळवून नेली असल्याची घटना मौजे हटकर मंगेवाडी ता. 

सांगोला येथे दि.२७ मे २०२५ रोजी सकाळी ४ वाजता ते ६ वाजणेच्या दरम्यान घडली. सदर चोरीची फिर्याद खातुनबी पिरसाहेब शेख (वय ८० वर्षे रा. हटकर मंगेवाडी ता. सांगोला) यांनी सांगोला पोलीस स्टेशनला दिली आहे.

चोरट्यांनी ७५ हजार रुपये किंमतीची अंदाजे ३ तोळे वजनाची एक सोन्याची साखळीतील बारीक मण्याची मोहन म ाळ तसेच २५ हजार रुपये किंमतीची अंदाजे १ तोळे वजनाची

 एक सोन्याची बोरमाळ असे एकूण १ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने पळवून नेले आहेत. सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती

 अशी की, दि. २७ मे २०२५ रोजी पहाटे ४ वाजणेच्या सुमारास खातुनबी शेख यांनी नेहमी प्रमाणे घराच्या बाहेरील बांधरूम मध्ये अंघोळीस जाण्याअगोदर गळ्यातील सोन्याची मोहनमाळ व बोरमाळ बाथरुमच्या बाहेर काढून

 ठेवुन अंघोळीला गेल्या होत्या. अंघोळ करीत असताना घराचा मुख्य दरवाज्याचा आवाज आल्याने खातुनबी शेख या पटकन अंघोळ करून कोण आहे 

पाहण्यासाठी बाहेर आल्या. परंतु तेव्हा कोणी नव्हते. अंघोळीला जा-ताना ठेवलेले सोन्याचे दागिणे ठेवलेल्या ठिकाणी मिळुन आले नाहीत. 

त्यानंतर संपुर्ण घरात, घराच्या आजुबाजुच्या परिसरात अंघोळीकरिता जाताना ठेवलेली सोन्याची मोहनमाळ व बोरमाळ यांचा शोध घेतला असता त्या वस्तु मिळुन न आल्याने खात्री झाली 

की सोन्याची मोहनमाळ व बोरमाळ कोणीतरी अज्ञात चोरट्याने स्वताच्या फायद्याकरिता चोरुन घेवुन गेले असल्याची नोंद फिर्यादीमध्ये असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.

Post a Comment

0 Comments