मोठी बातमी..सांगोला पोलिसांची अवैध वाळूवर कारवाई; ३ लाख ७ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला / तालुका प्रतिनिधी अवैध वाळू वाहतूक करत असताना सांगोला पोलीसांनी ३ लाख ७ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला असल्याची घटना खवासपूर ता. सांगोला येथे घडली. पोलीसांनी ३ लाख रुपये किमतीचा
विना नंबरचा टमटम व ७ हजार रुपये किमतीची अंदाजे एक ब्रास वाळु असा एकुण ३ लाख ७ हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला असून फिर्याद पोकों लक्ष्मण बापु वाघमोडे यांनी दिली आहे.
सांगोला पोलीसांकडून मिळालेली अधिक माहिती अशी की, दि.२८ मे २०२५ रोजी अवैध वाळू वाहतुकीवर कारवाई करण्यासाठी
कटफळ दुरक्षेत्र हद्दित पेट्रोलिंग करीत करीत मौजे गोपनीय बातमीदारामार्फत बातमी मिळाली की, मौजे खवासपुर ते कटफळ जाणार्या रोडवर वाळुची गाडी येणार आहे
अशी माहिती मिळाल्यावरुन खवासपुर ते कटफळ जाणार्या रोडवर थांबलो असता खव-ासपुर कडुन एक चारचाकी वाहन येताना दिसले त्यास हात करून थांबण्याचा इशारा केला
त्यावेळी वाहन चालकाने त्याचे ताब्यातील वाहन रोडच्या कडेला घेवुन थांबवून चालक तेथुन पळुन गेला.
त्यानंतर सदर वाहन-ाजवळ जावुन त्याची पाहणी केली असता सदरचे टमटच्या पाठीमागील हौद्यामध्ये अंदाजे १ ब्रास वाळू भरलेली असल्याचे दिसले. त्यावेळी आम्ही टमटच्या चालकाबाबत आजुबाजुस विच-ारपुस केली
असता त्याचे नाव मिलिंद रणदिवे रा. दिघंची ता. आटपाडी असे असल्याचे सम जले. त्यानंतर वाळूने भरलेला वाहन पुढील कारवाईसाठी पो-लीस ठाणेस लावण्यात आले असल्याची माहिती सांगोला पोलीस ठाण्याकडून मिळाली आहे.
0 Comments