google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 सांगोला तालुक्यातील महिम सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर सरपंचपदासाठी शेकापचे नारनवर यांचे नाव निश्चित?

Breaking News

सांगोला तालुक्यातील महिम सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर सरपंचपदासाठी शेकापचे नारनवर यांचे नाव निश्चित?

 सांगोला तालुक्यातील महिम सरपंचांवरील अविश्वास ठराव मंजूर सरपंचपदासाठी शेकापचे नारनवर यांचे नाव निश्चित?


(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)

सांगोला: महिम (ता. सांगोला) ग्रामपंचायतीच्या विद्यमान सरपंच अर्चना सुरेश नारनवर यांच्याविरोधात १५पैकी १३ सदस्यांनी दाखल केलेला अविश्वास ठराव काल गुरुवारी १३ विरुद्ध २ मतांनी मंजूर करण्यात आला.

 त्यामुळे नवीन सरपंच निवडीचा मार्ग मोकळा झाला आहे. सरपंच पदासाठी शेकापकडून सचिन गजेंद्र नारनवर यांचे नाव निश्चित मानले जात आहे.

महिम ग्रामपंचायतीच्या १५ सदस्यांपैकी १३ सदस्यांनी सरपंच अर्चना नारनवर यांच्या कार्यशैलीवर नाराजी व्यक्त करत मनमानी कारभार, अपारदर्शक निर्णयप्रक्रिया

 आणि ग्रामपंचायतीच्या ठरावांची अंमलबजावणी न करणे आदी कारणांवरून ग्रा. सदस्य वसंत ईश्वरा रुपनर यांच्यासह इतर ११ ग्रामपंचायत सदस्यांनी सरपंच अर्चना नारनवर यांच्याविरुद्ध २३ मे रोजी 

तहसीलदार, सांगोला यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. दरम्यान, गुरुवार, दि. २९ मे रोजी दुपारी २:०० वाजता ग्रामपंचायत कार्यालयात तहसीलदार संतोष कणसे यांच्या अध्यक्षतेखाली अविश्वास ठरावावर

 विशेष सभेचे आयोजन केले होते. सभेसमोर हा ठराव मांडल्यानंतर १५पैकी ग्रा. सदस्य वसंत रुपनर, शंकर चौगुले, सचिन नारनवर, आबा कारंडे, अण्णासो कोळेकर,

 शिवाजी गोरवे, सदस्या सुरेखा महापुरे, आशाबाई पाटील, सुरेखा शेंडे, लक्ष्मी चौगुले, शकुंतला शिरगिरे, रानुबाई सावंत, स्वाती रुपनर अशा एकूण १३ ग्रामपंचायत सदस्यांनी हात वर करून अविश्वास ठरावाच्या बाजूने मतदान केले.

 सरपंच अर्चना नारनवर आणि उपसरपंच नानासाहेब बंडगर यांनी अविश्वास ठरावाला विरोध दर्शविला. यावेळी सरपंचांविरोधातील अविश्वास ठराव १३ विरुद्ध २ असा बहुमताने मंजूर झाला. 

याप्रसंगी मंडलाधिकारी प्रशांत जाधव, ग्रामविकास अधिकारी खानसाहेब मुलाणी, तलाठी बाळासाहेब कोळी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक श्रीकांत जाधव यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Post a Comment

0 Comments