धक्कादायक सांगोल्यातील घटना ! चालत्या गाडीवरच आला तरुणाला हृदयविकाराचा झटका; काही सेकंदात होत्याचं नव्हतं झालं
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला:- तरुणांमध्ये हल्ली हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने मृत्यू होण्याचे प्रमाण वाढत आहे. सांगोल्यात चालत्या बाईकवर एका तरुणाला हृदय विकाराचा तीव्र झटका आल्याचे समोर आले आहे.
हार्ट अॅटेक आल्याने तो चालत्या बाइकवरुनच खाली कोसळला. आजूबाजूला असलेल्या लोकांनी त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल केले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होता. या तरुणाचा मृत्यू झाला होता.
अचानक हृदयविकाराच्या झटका आल्याने चालत्या दुचाकीवरून रस्त्यालगत खड्यात पडून मंडप व्यावसायिक तरुणाचा मृत्यू झाला. ही घटना काल बुधवार, दि.२८ रोजी दुपारी ३ च्या सुमारास सांगोला महूद रस्त्यावरील चिंचोली तलावाजवळ घडली. नवनाथ बसवेश्वर पलसे (वय-३५, रा. शिवणे, ता. सांगोला) असे मृत तरुणाचे नाव आहे.
याबाबत, भाऊ आण्णासो बसवेश्वर पलसे यांनी खबर दिली असून पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.
सांगोला येथे मेडिकलमधून औषध घेऊन परत दुचाकीवरून सांगोल्याकडून-महूद रोडने शिवणे घराकडे जात असताना वाटेत चिंचोली तलावाजवळ चालत्या
दुचाकीवर त्यास अचानक हृदयविकाराचा झटका आल्याने तो दुचाकीसह रस्त्याच्या कडेला खड्यात जाऊन पडला. यामध्ये त्याच्या डोक्याला गंभीर मार लागून हात फॅक्चर झाला होता.
0 Comments