google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 मोठी बातमी.. शेकापच्या मनात धडकी..शहाजी बापूंचे युवा शिलेदार मैदानात

Breaking News

मोठी बातमी.. शेकापच्या मनात धडकी..शहाजी बापूंचे युवा शिलेदार मैदानात

मोठी बातमी.. शेकापच्या मनात धडकी..शहाजी बापूंचे युवा शिलेदार मैदानात 




सांगोला विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच चर्चेत असतो. महाराष्ट्रातील सर्वात जास्त चर्चेत असणारा हा मतदार संघ आहे.




या मतदारसंघाचे वैशिष्ट्य म्हणजे या मतदार संघाचे नेतृत्व २०१९ ते २०२४ या दरम्यान शिवसेनेचे नेते (झाडी डोंगर डायलॉग स्पेशालिस्ट) आदरणीय शहाजीबापू पाटील साहेब यांनी केले होते.

 सध्या सांगोला विधानसभा मतदारसंघाचे विद्यमान आमदार बाबासाहेब देशमुख हे शेकाप पक्षाचे आहेत. तरीही सध्या ते मतदारसंघात जेवढे ऍक्टिव्ह आहेत 

त्यापेक्षा जास्त शहाजी बापूंचे दोन युवा शिलेदार युवा नेते सागर पाटील आणि युवा नेते दिग्विजयदादा पाटील हे मतदारसंघात ऍक्टिव्ह आहेत.

आणि त्यामुळेच सध्या सांगोल्यातील शेकाप पक्षाच्या मनात धडकी भरत आहे.

लग्न सोहळे, वाढदिवस, वास्तुशांती समारंभ,कुळदैवत यात्रा, दुःखद प्रसंगी गाठी-भेटी,अशा सर्वच ठिकाणी, शिवसेना नेते लोकांमध्ये जात आहेत.

नागरीकांच्या अडी अडचणी समजून घेत आहेत.

गावा गावात जाऊन सर्वांच्या व्यथा व अडचणी समजून घेत आहेत,आणि अडी अडचणी सोडविण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

मा.आ.शहाजीबापू पाटील साहेब यांचे हे दोन युवा शिलेदार लोकांमध्ये जात आहेत त्यामुळे नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.

नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे नेते आदरणीय शहाजीबापू पाटील साहेब यांचा पराभव झाला त्यावेळी यापुढे आपणच आणि फक्त आपणच अशा प्रतिक्रिया शेकाप समर्थक देत होते.

पण.. निवडणुकीत जिंकल्यानंतर मात्र शेकाप गायब आणि शिवसेना ॲक्टीव्ह असेच सध्या तरी सर्वत्र वातावरण दिसून येत आहे.

त्यामुळे नागरिकांनी सुद्धा आश्चर्य व्यक्त केले आहे.

अनेक ठिकाणी शिवसेना नेते लोकांमध्ये जात असल्याने सांगोला तालुक्यातील गावागावातील शिवसेना कार्यकर्ते नैराश्यातून बाहेर येऊन पुन्हा कामाला लागले आहेत.

आणि त्यामुळेच सध्या सांगोल्यातील शिवसेना हा पक्ष मजबूत दिसत आहे.

आणि मा.आ.शहाजीबापू पाटील साहेब यांचे हात बळकट होताना दिसत आहेत.

युवा नेते शहाजी बापूंचे पुत्र श्री.दिग्विजयदादा पाटील व पुतने श्री.सागरदादा सुभाषनाना पाटील यांनी लढाईची कमान आपल्या हातात घेतल्यामुळे 

सांगोला तालुक्यातील शेकाप समर्थक मात्र प्रचंड अस्वस्थ दिसत आहेत कारण मतदारांमधून विद्यमान आमदार बॅकफूटवर व माजी आमदार फ्रंट फुटवर अशी कुजबूज सुरू झाली आहे.

Post a Comment

0 Comments