google.com, pub-8399173714797549, DIRECT, f08c47fec0942fa0 बिग ब्रेकिंग! भारत पाकिस्तान युद्ध थांबले

Breaking News

बिग ब्रेकिंग! भारत पाकिस्तान युद्ध थांबले

बिग ब्रेकिंग! भारत पाकिस्तान युद्ध थांबले


सीमेवर वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत आणि पाकिस्तानने संपूर्ण आणि तात्काळ युद्धबंदी करण्यास सहमती दर्शवली आहे, असे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सांगितले आहे. 

दरम्यान, पाकिस्तानचे परराष्ट्रमंत्री इशाक दार यांनीही युद्धबंदीला दुजोरा दिला आहे. त्यानंतर पाकिस्तानच्या डीजीएमओंचा भारताच्या डीजीएमओंना फोन आला. दरम्यान, आज पाच वाजेपासून युद्धबंदी लागू करण्यात आली आहे.

दोन्ही देशांचे डीजीएमओ पुन्हा या विषयावर १२ मे रोजी चर्चा करणार आहेत. त्यानंतर यावर सविस्तर चर्चा होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 

गेल्या काही दिवसांपासून दोन्ही देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. पाकिस्तानकडून सातत्याने भारतावर ड्रोन हल्ले होत होते. भारतीय लष्कराचे जवान त्याला तोंड देत होते.

भारताने आपल्या अटींवर युद्धविराम केल्याचे सांगितले जात आहे.

या घडामोडींच्या पार्श्वभूमिवर राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेण्यासाठी त्यांच्या निवासस्थानी गेले आहेत. यावेळी ते युद्धबंदीची मोदींना माहिती देतील.

भारताचे परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर म्हणाले, की भारत आणि पाकिस्तानने आज गोळीबार आणि लष्करी कारवाई थांबवण्याबाबत एक सामंजस्य करार केला आहे. 

भारताने सर्व प्रकारच्या आणि प्रकटीकरणातील दहशतवादाविरुद्ध सातत्याने ठाम आणि तडजोड न करणारी भूमिका कायम ठेवली आहे. ती पुढेही कायम राहील.

Post a Comment

0 Comments