मोठी बातमी..हळदीच्या अंगाने सांगोला तालुक्यातील कोळा गावचा सुपुत्र ऑपरेशन सिंदूर मोहिमेवर
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
कोळा : घरातील मंडळींनी लग्न ठरवल्यामुळे कोळा (ता. सांगोला) येथील जवान ४० दिवसांच्या सुटीवर तो आला....
५ मे रोजी लग्न झाले... युद्धजन्य परिस्थितीमुळे दुसऱ्याच दिवशी सैन्यदलाच्या सर्व सुट्या रद्द करण्यात आल्या... सर्वांना कर्तव्यावर हजर राहण्याचा संदेश देण्यात आला...
या संदेशानुसार अंगावरील हळदही सुखली नसलेल्या कोळा येथील जवानालाही कर्तव्यावर जाणे भाग पडले... या भावनिक प्रसंगी कुटुंबीयांसह कोळा ग्रामस्थांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या...
अंगावरची हळद निघण्यापूर्वीच तो राजस्थानमध्ये रणगाडा चालवण्यास जात आहे... आज दुपारी कोळा येथील जवान योगेश आलदर ऑपरेशन सिंदूर मोहिमेसाठी मिरज येथून रेल्वेने रवाना झाला.
आलदर कुटुंब मुळचे कोळा (ता. सांगोला) येथील आहे.
कोळा येथील अनेक कुटुंबे पोटा-पाण्यासाठी सांगलीत स्थायिक आहेत. योगेशच्या वडिलांचा फळविक्रीचा व्यवसाय आहे. शालेय जीवनात आठवी-नववीमध्ये असतानाच योगेशने सैन्यात जाण्याचा ध्यास घेतला होता.
शाळेत शिकत असतानाच घराजवळ असलेल्या मैदानावर तो भरतीसाठी सराव करत होता. बारावी झाल्यानंतर २०१९ मध्ये अखेर तो सैन्य दलात भरती झाला.
योगेशच्या या यशामुळे घरातील सर्वांनाच आनंद झाला. योगेश सध्या मेकॅनाइज्ड इन्फंट्री रणगाडा चालक म्हणून कार्यरत आहे. त्याची नियुक्ती राजस्थानमधील श्री गंगानगर भागात आहे.
नोकरीची पाच वर्षे पूर्ण झाल्यानंतर घरच्या मंडळींनी योगेशच्या लग्नाच्या हालचाली सुरू केल्या. बाज (ता. जत) येथील मुलगी पसंत पडली. ५ मे रोजी लग्न ठरले.
त्यामुळे ३० एप्रिल रोजी योगेश ४० दिवसांची सुटी घेऊन कोळा गावी आला. ५ मे रोजी थाटामाटात योगेशचा लग्न सोहळा पार पडला. सर्व पत्नीसोबत भारतीय जवान योगेश आलदर
चौकट
सीमेवरील भारत-पाकिस्तान युद्धामुळे लष्कराने जवानांच्या रजा, सुट्या रद्द केल्याचे समजताच घरातील सर्वजण सुट्टी वाढवा, अशी विनवणी करत होते.
परंतु देशसेवा माझ्यासाठी अत्यंत महत्वाची आहे. माझ्या वरिष्ठांनी देखील पुन्हा युद्धाची परिस्थिती निवळल्यानंतर सुटी घेण्यास सांगितले. त्यामुळे कर्तव्याला प्राधान्य देत निघालो आहे.
- योगेश आलदर
कुटुंबीय आनंदात होते. देशाच्या सीमेवर युद्ध सुरु झाल्यामुळे सैन्यदलाच्या सुट्या रद्द करून सर्वांना परत बोलवण्यात आले. ता. ७ रोजी योगेशने मोबाइलवर मेसेज पाहिला.
पुन्हा कर्तव्यावर जावे लागणार असल्याचे त्याने सांगताच पत्नीसह सर्वांना धक्का बसला. सर्वांच्या डोळ्याच्या कडा ओलावल्या. "आत्ताच लग्न झाले आहे,
अजून अंगावरची हळद निघाली नाही, जाऊ नकोस" असे सर्वजण विनवणी करू लागले. परंतु योगेशने कशीबशी सर्वांची समजूत काढली. सर्व सहकारी जवान हजर झाले आहेत.
देशसेवेसाठी जाणे आवश्यक असल्याचे समजावून सांगितले. पत्नीसह सर्व कुटुंबीयांची समजूत काढण्यात योगेशला यश आले. आज तो देशसेवेसाठी रवाना झाला.
0 Comments