खासदार धैर्यशील मोहिते-पाटील यांचा सांगोला दौरा
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
सांगोला, ता. १० मे: सांगोला तालुक्यातील विविध समस्या, विकासकामे आणि सामाजिक संवाद यांचा समावेश असलेल्या महत्त्वपूर्ण दौऱ्यात खासदार मा. धैर्यशील भैय्या मोहिते-पाटील यांनी प्रत्यक्ष ठिकाणी जाऊन पाहणी केली,
नागरिकांचे म्हणणे ऐकले, अधिकाऱ्यांना सूचना दिल्या आणि सामाजिक स्नेहसंबंध दृढ करत आपुलकीचा संवाद साधला. त्यांच्या या सक्रिय दौऱ्यामुळे नागरिकांमध्ये समाधान आणि आश्वासक विश्वास निर्माण झाला आहे.
सांगोला-मिरज रेल्वे बोगदा:
बोगद्याखाली साचणारे पाणी व वाहतुकीतील अडथळ्यांच्या समस्यांची दखल घेऊन, खासदार पाटील यांनी प्रत्यक्ष पाहणी केली व रेल्वे व नागरी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना
त्वरित उपाययोजना करण्याचे निर्देश दिले. "या समस्येवर लवकरच अधिकृत बैठक घेऊन कायमस्वरूपी तोडगा काढण्यात येईल," असे त्यांनी स्पष्ट सांगितले.
वासुद रेल्वे स्टेशन रस्ता काम:
मौजे वासुद (ता. सांगोला) येथे सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची सद्यस्थिती तपासून, दर्जा, गती व अडथळ्यांबाबत रेल्वे विभागाशी चर्चा करून त्यांनी आवश्यक सूचना दिल्या.
निरा उजवा कालवा – फाटा क्र. ५ अकोला:
नवीन वितरिका निर्माणाच्या मागणीवर, त्यांनी फाट्याची पाहणी केली व संबंधित अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन लवकरच निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन दिले. "शेतकऱ्यांना न्याय मिळवून देणे ही माझी प्राथमिकता आहे," असे त्यांनी नमूद केले.
नकातेवाडी (अकोला) नवीन रेल्वे बोगदा:
या प्रस्तावित बोगद्याच्या ठिकाणी पाहणी करून, अडचणींचा आढावा घेतला व त्वरित बैठक घेऊन कामाला गती देण्याच्या सूचना प्रशासनाला दिल्या.
MPSC यशस्वी विद्यार्थिनीचा सत्कार:
कु. शितल बाळासाहेब नकाते हिने MPSC परीक्षेत मिळवलेल्या यशाबद्दल तिचा गौरवपूर्वक सत्कार करण्यात आला.
ज्येष्ठ नेते बाबुरावजी गायकवाड,
मा. योगेश खटकाळे, डॉ. निरंजन केदार, किशोर शास्त्री यांच्या निवासस्थानी भेट
पत्रकार भारत कदम यांच्या वडिलांच्या निधनानंतर सांत्वनपर भेट:
पत्रकार भारत कदम यांच्या वडिलांच्या निधनानंतर, खासदार पाटील यांनी त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन संवेदना व्यक्त केल्या.
या दौऱ्यादरम्यान आ.डाॅ.बाबासाहेब देशमुख, जेष्ठ नेते बाबुराव गायकवाड व पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते.
0 Comments