ब्रेकिंग न्यूज..खडकाळ माळरानावर फुलवली केशर आंब्याची बाग; सांगोल्याच्या तरुण शेतकऱ्याची कमाल
(शब्दरेखा एक्स्प्रेस न्युज संपादक संतोष साठे ९५०३४८७८१२)
दुष्काळी भाग शिवाय खडकाळ जमीन. यात काय पिकवायचे हा प्रश्न कायमचा आहे. मात्र अशा परिस्थितीत देखील
सांगोला तालुक्यातील लक्ष्मीनगर येथील सोमनाथ नरळे या तरुण शेतकऱ्याने अत्यंत कमी पाण्यात खडकाळ माळरानावर केशर आंब्याची बाग फुलवली आहे.
यातून यावर्षी पाच एकर आंबा बागेतून जवळपास १५ टन उत्पादन अपेक्षीत आहे. सध्या दोन टन आंब्याची पुण्याच्या बाजारपेठेत तीनशे रुपये किलो दराने विक्री केली आहे.
पंढरपूरच्या सांगोला तालुका हा दुष्काळी तालुका म्हणून ओळखला जातो. शिवाय या भागात सुपीक अशी जमीन फार कमी आहे. यामुळे पिकांचे उत्पादन चांगले येत नसते.
मात्र पदवीधर असलेल्या सोमनाथकडे वडीलोपार्जित असलेल्या सहा एकर शेती आहे. शेतीला शाश्वत पाणी नसल्याने पावसाळी हंगामात पिके घेतली जायची.
यामुळे वेगळा प्रयोग करण्याचे सोमनाथने ठरविले. कमी पाण्यात आणि उपलब्ध साधनांना अत्यंत कुशलतेने वापर करुन सोमनाथ यांनी २०२० साली पाच एकर खडकाळ माळरानावर केशर आंब्याची लागवड केली.
लक्ष्मीनगर भागात पाण्याचे दुर्भिक्ष आहे. पावसाळ्याच्या पाण्यावर शेती केली जाते. वेगळा प्रयोग म्हणून सोमानथ यांनी धाडसाने आंबा फळ बागेची लागवड केली आहे.
ठिंबक सिंचनाद्वारे कमी पाण्यात बाग जोपासली आहे. मोठ्या कष्टाने जोपासलेल्या बागेने यंदा सोमनाथ यांना लखपती केले आहे.
सध्या आंब्याची काढणी सुरु झाली आहे. लागवडीपासून तीन वर्षानंतर फळधारणा सुरु झाली.
यावर्षी पोषक हवामान आणि बागेचे योग्य व्यवस्थापन केल्यामुळे फळांची संख्या वाढली आहे. यामुळे यंदाच्या हंगामात किमान १५ टन उत्पादन अपेक्षित आहे.
आतापर्यंत दोन टन आंब्याची पुणे येथील बाजारात तीनशे रुपये प्रती किलो दराने विक्री केली आहे. त्यातून सहा लाख रुपये मिळाले आहेत.
आणखी बागेत सुमारे १३ टन आंबा शिल्लक आहे. सरासरी दोनशे रुपये प्रती किलो भाव मिळाला; तर आणखी २६ लाख रुपयांचे उत्पन्न अपेक्षित आहे.
पाच एकर बागेसाठी खते, किटक नाशक फवारणी, मजूर, तोडणी आणि वाहतूकीसाठी तीन ते साडे तीन लाख रुपयांचा खर्च आला आहे.
खर्च वजा जाता आंबा पिकातून किमान ३० लाख रुपयांचा निव्वळ नफा मिळेल; असा विश्वास सोमनाथ नरळे यांनी व्यक्त केला आहे.
0 Comments